(Source: ECI/ABP News/ABP Majha)
12th September Headlines : नागपूरमध्ये ओबीसी कुणबी समाजाचे आजपासून साखळी उपोषण, मुंबईत ओबीसी परिषद; आज दिवसभरात
12th September Headlines : कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीकडून सुरू असलेल्या आंदोलनात आजपासून साखळी उपोषण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे.
12th September Headlines : नागपूरमध्ये सुरु असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीकडून सुरू असलेल्या आंदोलनात आजपासून साखळी उपोषण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जालन्यात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे.
नागपूरमध्ये सुरु असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस
नागपूरमध्ये सुरु असलेल्या ओबीसी कुणबी समाजाच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला समर्थन देणारा काँग्रेस नेते सुनील केदार आंदोलस्थळी भेट देऊन आपले समर्थन दिले. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसेपाटील यांनी देखील आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नागपूरच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी कोळसेपाटील यांनी एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस,अजित यांच्यावर टीका केली. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये या मागणीला घेऊन ओबीसी कुणबी समाजाचे नागपूरमध्ये धरणे आंदोलन सुरू आहे. कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीकडून सुरू असलेल्या आंदोलनात आजपासून साखळी उपोषण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस
जालना: मनोज जरांगेच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बदनापूर ते अंतरवली सराटी पर्यत मराठा आंदोलकांच्यावतीने ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.
मुंबईत 30 ओबीसी संघटनांकडून आज राज्यव्यापी ओबीसी परिषद
मुंबई - ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध बघायला मिळत आहे. सोबतच, मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यास देखील विरोध बघायला मिळतो आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज विरोध करताना बघायला मिळणार आहे. याप्रकरणी 30 ओबीसी संघटनांकडून आज राज्यव्यापी ओबीसी परिषद मुंबईच्या मराठी पत्रकार संघात बोलवली आहे. यावेळी ओबीसी समाजातील 150 पदाधिकारी या परिषदेला हजेरी लावतील. ओबीसी समाजातून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
अजित पवारांनी बोलवली देवगिरीवर बैठक
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या माध्यमातून आमदारांचे स्थानिक प्रश्न यासोबतच मराठा आरक्षणाचे राज्यातली परिस्थिती आमदार आपात्रतेबाबत शरद पवार यांच्या गटाच्या वतीने सुरू असलेली जोरदार कारवाई अशा प्रमुख विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
iPhone 15 सीरीज लाँच होणार
कॅलिफोर्निया-Apple आज iPhone 15 सीरीज लाँच करणार आहे. कंपनीने या लॉन्च इव्हेंटला 'वंडरलस्ट' असं नाव दिलं आहे. या लॉन्चिंग इव्हेंटची सारेच वाट पाहतायत. या इव्हेंटमध्ये आयफोनशिवाय अनेक गॅजेट्सही लॉन्च होणार आहेत. हा लॉन्चिंग इव्हेट तुम्ही Apple च्या यूट्यूब चॅनल, ऑफिशियल वेबसाईट आणि टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम घरी बसून पाहू शकता. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता होणार आहे.
राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
दिल्ली – राजद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारला कायद्याचा आढावा घेण्यासाठी वेळ दिला होता. परंतु त्याचवेळी न्यायालयाने म्हटले होते की सध्या आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत कोणतीही नवीन प्रकरणे नोंदवू नयेत आणि आधीच प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन कार्यवाही थांबवावी असे निर्देश दिले होते.