एक्स्प्लोर

12th May In History : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यामध्ये दाखल, चीनमधील भूकंपात 87 हजार लोकांचा जीव गेला; आज इतिहासात

On This Day In History : जगभरातील पर्यटकांच्या आवडीच्या असलेल्या जोधपूर शहराची स्थापना आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे 1459 रोजी झाली. राव जोधा या राजाने या शहराची स्थापना केली. 

12th May In History  : मराठ्यांच्या इतिहासात आग्र्याहून सुटका ही घटना सुवर्ण अक्षरातून लिहिली गेली आहे. औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे 12 मे 1666 रोजी आग्र्याला पोहोचले आणि पुढील इतिहास घडला. तर चीनच्या इतिहासात आजचा दिवस हा काळा दिवस असल्यासारखा आहे, कारण 12 मे 2008 रोजी चीनमध्ये भूकंप झाला आणि जवळपास 87 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर चार लाख लोक जखमी झाले. या भूकंपामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आणि लाखो लोक बेघर झाले. या भूकंपामध्ये चीनच्या अगणित मालमत्तेचं नुकसान झालं. जाणून घेऊया आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना,

1459 - जोधपूरची स्थापना

मंडोरचा राजा राव जोधा याने 12 मे 1459 रोजी जोधपूर या शहराची स्थापना (Foundation Of Jodhpur) केली. जोधपूर हे राजस्थानचे दुसरे मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या 10 लाखांच्या वर आहे.  हे शहर मारवाड या ऐतिहासिक संस्थानाची राजधानी होती. जोधपूर हे थारच्या वाळवंटात अनेक भव्य राजवाडे, किल्ले आणि मंदिरे असलेले एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. वर्षभर उष्ण हवामानामुळे याला सन सिटी असेही म्हणतात. येथे असलेल्या मेहरानगड किल्ल्याभोवती हजारो निळ्या घरांमुळे याला ब्लू सिटी म्हणूनही ओळखले जात होते. 

1666- शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला पोहोचले

आजचा दिवस मराठ्यांच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 12 मे 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे मिर्झाराजेंशी केलेल्या तहानुसार मुघल सम्राट औरंगजेबाच्या (Aurangzeb) भेटीला आग्र्याला पोहोचले. 

छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्याला नियंत्रित ठेवण्यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंह यांना दक्षिणेला पाठवलं. त्यावेळी मिर्झाराजेंनी स्वराज्याचं मोठं नुकसान केलं, त्यामुळे त्यांच्याशी तह करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. महाराजांनी आपल्याजवळीत 24 किल्ले हे मुघलांना दिले आणि या तहानुसार औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला (Agra Fort) जायचं कबुल केलं. शिवाजी महाराजांसोबत संभाजीराजेही होते. 

आग्र्याला भेटीसाठी गेलेल्या महाराजांना औरंगजेबाने दगा करुन अटक केली आणि त्यांना आग्र्याच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवलं. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात (Maratha History) अनन्यसाधारण महत्त्व आहे.

1784 - पॅरिस करार अंमलात

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये युद्ध संपवणाऱ्या 1783 सालच्या पॅरिस कराराची (Treaty of Paris) 12 मे 1784 रोजी अंमलबजावणी झाली. या कराराने अमेरिकन क्रांतीयुद्ध संपलं. 3 सप्टेंबर 1783 रोजी, ग्रेट ब्रिटनचा राजा जॉर्ज तिसरा आणि युनायटेड स्टेट्सच्या प्रतिनिधींनी पॅरिसमध्ये करारावर स्वाक्षरी केली, ज्याला अनेकदा पॅरिसचा तह (1783) म्हणून संबोधले जाते. यासोबतच व्हर्सायमध्ये राजा लुई सोळावा आणि फ्रान्सचा राजा चार्ल्स तिसरा यांच्याशीही दोन करार झाले. या करारांना बर्‍याचदा व्हर्सेलीचा तह (1783) असे म्हणतात.

पॅरिसचा तह झाल्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड नॉर्थ यांनी राजीनामा दिला होता. पॅरिसच्या करारावर स्वाक्षरी केल्याने अखेरीस ब्रिटन आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपुष्टात आले. 

1993 - प्रसिद्ध हिंदी कवी समशेर बहादूर सिंग यांचे निधन

समशेर बहादूर सिंग हे संपूर्ण आधुनिक हिंदी कवितेमध्ये एक अतिशय खास कवी म्हणून ओळखले जातात. हिंदी कवितेत सतत प्रयोग करणारे, काव्यात्मक भाषा म्हणून प्रतिमा वापरणारे, प्रेम आणि सौंदर्याचे कवी आणि अद्वितीय संवेदनात्मक प्रतिमांचे निर्माते अशी त्यांची ओळख. समशेर आयुष्यभर पुरोगामी विचारसरणीशी जोडले गेले. 'चुका भी हूँ नहीं मैं' साठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त समशेर यांनी कवितेव्यतिरिक्त निबंध, कथा आणि डायरी लिहिल्या आणि अनुवाद कार्याव्यतिरिक्त हिंदी-उर्दू शब्दकोशाचे संपादन केले.

2008 - चीनमध्ये भूकंप, 87 हजाराहून अधिक मृत्यू

12 मे 2008 रोजी चीनमध्ये भूकंप (china earthquake) झाला आणि जवळपास 87 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर चार लाख लोक जखमी झाले. या भूकंपामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आणि लाखो लोक बेघर झाले. या भूकंपामध्ये चीनच्या अगणित मालमत्तेचं नुकसान झालं. 

2010 - आफ्रिकी एअरवेजचे विमान क्रॅश, 103 जणांचा मृत्यू

12 मे 2010 रोजी आफ्रिका एअरवेजचे एक विमान लिबियातील त्रिपोली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ क्रॅश झाले. या विमानातून प्रवास करणाऱ्या 104 पैकी 103 जणांचा मृत्यू झाला.

2015 - नेपाळमध्ये भूकंप, 218 जणांचा मृत्यू 

12 मे 2015 रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात (Nepal Earthquake) 218 लोकांचा मृत्यू झाला आणि 3,500 हून अधिक लोक जखमी झाले.



आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget