एक्स्प्लोर

10th September Headlines : जी -20 परिषदेचा दुसरा दिवस, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार सामना; आज दिवसभरात

10th September Headlines :मुंबईसाठी हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आज समारोप होणार आहे.

मुंबई : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. 

जी-20 परिषदेचा दुसरा दिवस

नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर  पंतप्रधान मोदी आज 9 देशांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. तर  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ते द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. 

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना

आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसरा सामना होणार आहे. पहिला सामना हा पावसामुळे रखडला. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होईल. 

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

 आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.  तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

कोल्हापुरात अजित पवारांची  उत्तरदायित्व सभा

कोल्हापुरात अजित पवारांची  उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. यावेळई जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येईल. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन मैदानावर सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होईल.यावेळी उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. 

उद्धव ठाकरे जळगावात

 पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभासाठी उद्धव ठाकरे  आज जळगावमध्ये जाणार आहेत. उद्धव ठाकरे पिंपराळा येथील मानराज पार्क मैदानात सभा देखील घेणार आहेत. 

शरद पवारांनी बोलावली  बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि  जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार मतदारसंघ निहाय चाचपणी करणार आहेत. 

मुंबईला पावसाचा यलो अलर्ट 

संपूर्ण ऑगस्ट महिना विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतही सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज मुंबईला यलो अलर्ट देण्यात आलाय. वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget