एक्स्प्लोर
10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान, 23 फेब्रुवारीला निकाल

मुंबई : राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि नागपूर वगळता 25 जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 21 फेब्रुवारीला दहा महापालिकांसाठी मतदान होणार असून 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तर 25 जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 16 फेब्रुवारीला मतदाना पहिला टप्पा पार पडणार असून यात 15 जिल्ह्यांचा समावेश असेल. तसंच दुसऱ्या टप्प्यासाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल 23 फेब्रुवारीलाच जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद पहिला टप्पा - (16 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्हा परिषद दुसरा टप्पा - (21 फेब्रुवारीला मतदान, निकाल 23 फेब्रुवारी) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली
नागपूर जिल्हा परिषद का वगळली ? पारशिवनी आणि वानाडोंगरी हे जिल्हा परिषद मतदार संघ होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना नगरपरिषद, नगरपंचायत घोषित केले. या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. निवडणुकीला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना, असा सरकारी निर्णय घेता येत नाही, असं वाद याचिकाकर्त्याने केला. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतून वगळण्यात आली आहे.
| जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम | ||
| निवडणूक कार्यक्रम तपशील | पहिला टप्पा (15 जि. प. व 165 पं.स.) | दुसरा टप्पा (11 जि. प. व 118 पं.स.) |
| नामनिर्देशनपत्र सादर करणे | 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2017 | 1 ते 6 फेब्रुवारी 2017 |
| नामनिर्देशनपत्रांची छाननी | 2 फेब्रुवारी 2017 | 7 फेब्रुवारी 2017 |
| जिल्हा न्यायाधीशांकडे अपील | 5 फेब्रुवारी 2017 | 10 फेब्रुवारी 2017 |
| निकालाची संभाव्य अंतिम तारीख | 8 फेब्रुवारी 2017 | 13 फेब्रुवारी 2017 |
| अपील नसल्यास उमेदवारीची माघार | 7 फेब्रुवारी 2017 | 13 फेब्रुवारी 2017 |
| अपील असल्यास उमेदवारीची माघार | 10 फेब्रुवारी 2017 | 15 फेब्रुवारी 2017 |
| मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धी करणे | 10 फेब्रुवारी 2017 | 15 फेब्रुवारी 2017 |
| मतदानाचा दिनांक | 16 फेब्रुवारी 2017 | 21 फेब्रुवारी 2017 |
| मतमोजणीचा दिनांक | 23 फेब्रुवारी 2017 | 23 फेब्रुवारी 2017 |
| महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम | |
| तपशील | दिनांक |
| नामनिर्देशनपत्र सादर करणे | 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2017 |
| नामनिर्देशनपत्रांची छाननी | 4 फेब्रुवारी 2017 |
| उमेदवारी माघारीची मुदत | 7 फेब्रुवारी 2017 |
| निवडणूक चिन्ह वाटप | 8 फेब्रुवारी 2017 |
| मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी | 8 फेब्रुवारी 2017 |
| मतदानाचा दिनांक | 21 फेब्रुवारी 2017 |
| मतमोजणीचा दिनांक | 23 फेब्रुवारी 2017 |
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्त्वाचे मुद्दे
1. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आतापासून आचारसंहिता लागू 2. ज्या जिल्ह्यात महापालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक नाही तिथे विकासाचं काम करण्यावर बंधन नाही 3. 14 फेब्रुवारीपासून एक्झिट पोल घेण्यास बंदी 4. निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र बँक खाते उघडायचं 5. निवडणूक झाल्यानंतर झालेला खर्च 30 दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे जमा करावा 6. महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होते, ही शोभणारी बाब नाही. बँक, एनजीओ, कॉर्पोरेट कंपनी अशा सर्व माध्यमातून प्रसार करणार 7. महापालिकेसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून प्रचारबंदी 8. हॉटेल, रेस्टॉरंट यांनी आश्वासन दिलं, मतदान करणाऱ्यांना बिलावर सवलत मिळणार 9. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांना राज्य सरकारने नगर परिषद, नगर पंचायत घोषित केलं. कोर्टात चॅलेंज केल्यामुळे नागपुरातील जिल्हा परिषदेची निवडणूक वगळली 10. नगरपालिका निवडणुकीत 10 कोटी रुपयांची दारु जप्त, 10 हजार जणांना तडीपार, दोन हजार जणांविरोधात फौजदारी कारवाईमहापालिका : मतदान आणि निकालाची तारीख
| महापालिका | मतदानाची तारीख | निकालाची तारीख |
| मुंबई | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| पुणे | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| पिंपरी चिंचवड | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| ठाणे | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| www.abpmajha.in | ||
| उल्हासनगर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| नाशिक | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| नागपूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| अकोला | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| www.abpmajha.in | ||
| अमरावती | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| सोलापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
जिल्हा परिषद : मतदान आणि निकालाची तारीख
| जिल्हा परिषद | मतदानाची तारीख | निकालाची तारीख |
| रायगड | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| रत्नागिरी | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| सिंधुदुर्ग | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| पुणे | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| सातारा | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| सांगली | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| सोलापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| कोल्हापूर | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| www.abpmajha.in | ||
| नाशिक | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| जळगाव | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| अहमदनगर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| अमरावती | 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| बुलडाणा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| यवतमाळ | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| औरंगाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| जालना | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| परभणी | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| हिंगोली | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| बीड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| नांदेड | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| उस्मानाबाद | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| www.abpmajha.in | ||
| लातूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| नागपूर | ----- | ----- |
| वर्धा | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| चंद्रपूर | 16 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
| गडचिरोली | 16 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी | 23 फेब्रुवारी |
दहा महानगरपालिकेतले सध्याचे पक्षीय बलाबल
1) मुंबई – एकूण सदस्य संख्या – 227 सत्ता – शिवसेना-भाजप युती शिवसेना – 75 भाजप – 31 काँग्रेस – 52 राष्ट्रवादी काँग्रेस – 13 मनसे – 28 समाजवादी पार्टी – 9 अखिल भारतीय सेना – 2 भारिप – 1 रिपाइं – 1 अपक्ष – 15 2) ठाणे – एकूण सदस्य संख्या – 130 सत्ता – शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील. शिवसेना – 57 भाजप – 8 काँग्रेस – 13 राष्ट्रवादी – 30 मनसे – 7 अपक्ष – 15 3) उल्हासनगर – एकूण सदस्य संख्या – 78 सत्ता – शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार) शिवसेना – 20 भाजप – 11 आरपीआय – 4 साई – 7 बसपा – 2 राष्ट्रवादी काँग्रेस – 8 काँग्रेस – 20 अपक्ष – 6 4) पुणे – एकूण सदस्य संख्या -156 सत्ता – राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 29 मनसे – 28 शिवसेना – 15 भाजप – 26 आरपीआय – 2 5) पिंपरी – एकूण सदस्य संख्या – 128 सत्ता – राष्ट्रवादी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 32 प्रभाग असतील म्हणजेच 128 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी – 83 शिवसेना – 15 काँग्रेस – 13 मनसे – 4 भाजपा – 3 आरपीआय – 1 अपक्ष – 9 6) सोलापूर – एकूण सदस्य संख्या – 102 सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 26 प्रभाग असतील म्हणजेच 102 सदस्य निवडून येतील. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग) काँग्रेस – 44 राष्ट्रवादी – 14 भाजप – 26 शिवसेना – 10 बसपा – 3 माकपा – 3 आरपीआय – 1 अपक्ष – 1 7) नाशिक – एकूण सदस्य संख्या – 122 सत्ता – मनसे-अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 31 प्रभाग असतील म्हणजेच 122 सदस्य निवडून येतील. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार) मनसे – 39 शिवसेना-रिपाइं – 22 काँग्रेस – 16 भाजपा – 14 राष्ट्रवादी – 20 माकप – 3 अपक्ष – 6 जनराज्य – 2 8) नागपूर – एकूण सदस्य संख्या – 145 सत्ता – भाजप यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)भाजप – 63 काँग्रेस – 41 शिवसेना – 6 राष्ट्रवादी – 6 बसपा – 12 मनसे – 2 मुस्लीम लीग – 2 अपक्ष – 13 9) अकोला – एकूण सदस्य संख्या – 73 सत्ता – सेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 80 सदस्य निवडून येतील. भाजप – 18 काँग्रेस – 18 शिवसेना – 8 भारिप-बमसं – 8 राष्ट्रवादी – 5 शहर सुधार समिती – 3 यूडीएफ – 2 समाजवादी पक्ष – 1 मनसे – 1 अपक्ष – 9 10) अमरावती – एकूण सदस्य संख्या – 87 सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.) भाजप – 7 शिवसेना – 11 राष्ट्रवादी – 18 काँग्रेस – 25 बसपा – 6 जनविकास काँग्रेस – 6 जनविकास आघाडी – 7 आरपीआय (अ) – 2 आरपीआय (ग) – 1 इतर – 4आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























