Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात तब्बल 10 किमी वाहनांच्या रांगा; पुण्याकडील वाहतूक तुंबली
अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद आहेत.
Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) बोरघाटात तब्बल 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पुण्याच्या दिशेने होणारी वाहतूक (Traffic stopped while going to Pune) तुंबली आहे. अडोशी टनेलच्या अगोदरपासून अमृतांजन ब्रिजपर्यंत व पुण्याच्या दिशेला खंडाळाकडे 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेसह जुन्या मार्गावर खोपोली हद्दीत बोरघाटात शेकडो वाहने बंद आहेत.
दुसरीकडे, बोरघाटात शेकडो संख्येने प्रवासी वाहने बंद आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गांवर (Mumbai Pune Expressway) पुण्याकडे जाताना शिंग्रोबाच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणात वाहने बंद आहेत. मोठ्या संख्येने महिला, लहान मुले रस्त्यावर बसून आहेत. टोविंग वॅन, मेकॅनिकच्या प्रतीक्षेत शेकडो प्रवासी आहेत.
सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी
शनिवार व रविवारला जोडून तसेच ख्रिसमस सुट्टी आल्याने सलग सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोल नाका व खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अतिशय संथ गतीने वाहने पुढे सरकत होती. खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी भर पडत आहे.
लोणावळा शहरातही मोठ्या संख्येने पर्यटक दाखल
लोणावळा शहरातही मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, वाहनांच्या संख्येपुढे रस्ते तोकडे पडत असल्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या