एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue : फडणवीसांच्या 'जल आक्रोश मोर्च्या'ला आज परवानगी मिळण्याची शक्यता,पण....

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्च्यासाठी भाजपकडून शहरातील वेगवगेळ्या भागात बैठक सुद्धा घेण्यात येत आहे.

Aurangabad Water Issue : औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु या मोर्च्याला अजूनही परवानगी मिळाली नसून आज रात्रीपर्यंत या मोर्च्याला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र परवानगी देताना पोलिसांकडून काही अटी-शर्ती देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तर परवानगीबाबतचा अंतिम निर्णय औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता घेणार असून परवानगीची फाईल त्यांच्याकडे पोहचली असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासुन औरंगाबाद शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे याच मुद्यावरून भाजपाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सतत आंदोलन केले जात आहे. त्यांनतर आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 तारखेला भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा; काढण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्नही भाजपाकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

असा असणार मोर्चा....  

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची जोरदार तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजता हा मोर्चा शहरातल्या पैठणगेट येथून निघणार असून महानगरपालिका कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. यावेळी भाजपचे खासदार,आमदार ,माजी नगरसेवक यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची सुद्धा उपस्थिती असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेची सावध भूमिका....

शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून सर्वसामन्य नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यात भाजपकडून सेनेला घेरण्याचा केला जात असेलेला प्रयत्न पाहता शिवसेनेने सावध भूमिका घेतली आहे. म्हणूनच पालकमंत्री सुभाष देसाईंनी पाणी पट्टी ५० टक्क्यांनी कमी केली आहे. तर पाणी प्रश्नावरून शिवसेनेवर आरोप करणारे भाजपा महानगरपालिकेत सत्तेत सोबत होती. त्यामुळे त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा अधिकार नसल्याचं शिवसेनेकडून बोललं जात आहे.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
चक्कर, ताप, मळमळ ते अशक्तपणा! मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget