एक्स्प्लोर

NEET Latur Pattern : 'नीट'चा लातूर पॅटर्न... 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स, एकाच जिल्ह्यातून दोन-अडीच हजार मुलं डॉक्टर होणार

NEET UG Result 2023: लातूरमधील महाविद्यालयं आणि खासगी कोचिंग क्लासेसमधील दोन हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण घेतले आहेत. 

लातूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा लातूर पॅटर्न तर राज्यात गाजतोय, त्याच्या सोबतीला आता 'नीट'चाही लातूर पॅटर्न (NEET Latur Pattern) चर्चेत आला आहे. लातूर या एकाच जिल्ह्यातून तब्बल दोन-अडीच हजार मुलं आता डॉक्टर होण्याच्या मार्गावर आहेत. मंगळवारी रात्री नीट परीक्षेचा निकाल (NEET UG Result 2023) लागला आणि त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण मिळवले. त्यामुळे नीटमध्येही आता लातूर पॅटर्नचा डंका वाजतोय. 

वैद्यकीय अभ्यासक्रमात पूर्व परीक्षांचा निकाल कोविड नंतर काही प्रमाणात मंदावला होता. मात्र यावर्षी निकालाने सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. यावर्षी नीट परीक्षेत दोन हजार पेक्षा जास्त मुले ही  वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील,  तेवढ्या गुणांची त्यांनी कमाई केली आहे. 

एकाच शहरातील हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्या कॉलेज मधून थोडी थोडकी नव्हे तर चक्क 1200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 500 पेक्षा जास्त गुण घेत नीट परीक्षेत यश मिळवले आहे. एकूण 720 गुणांपैकी 700 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही चार इतकी आहे. तर 650 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 55 पेक्षा अधिक आहे. 600 गुण घेणारे 223 पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. या आकडेवारीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

नीटच्या 6400 जागांसाठीचा निकाल हा मंगळवारी रात्री लागला आहे. त्यामध्ये एकट्या लातूर जिल्ह्यातून 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचं स्पष्ट आहे. या परीक्षेचा निकाल अद्याप अपडेट केला जात आहे. त्यामुळे या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. हाच तो लातूर पॅटर्न आहे, येथील विद्यार्थ्यानी एकाच शहरातून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश घेण्यासाठी पात्र होण्याचा विक्रम रचला आहे.

लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून त्यामध्ये 500 ते सातशे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 431 इतकी आहे. 

  • 500 गुण पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी ....431
  • 550..गुण पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी 260
  • 600...गुण पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी..119
  • 650...गुण पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी.35
  • 700.गुण पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी..01

राजश्री शाहू महाविद्यालयातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल असा विश्वास सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केला आहे. कोविड काळानंतर लागलेला हा विक्रमी निकाल आहे. 2018 साली जे भरघोस यश मिळालं होतं त्यानंतरचा हा सर्वोत्कृष्ट निकाल आहे. एकट्या राजश्री शाहू महाविद्यालयाचाच नव्हे तर लातूर मधील अनेक महाविद्यालय त्याचबरोबर इथल्या कोचिंग क्लासेस यांनाही यावर्षी भरघोस यश मिळालं आहे. लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. यासाठी इथले प्रत्येक महाविद्यालय, इथले शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे क्लास स्टाफ यांनी जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचे हे फळ आहे असं मत दिलीप देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. 

लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि रिलायन्स लातूर पॅटर्न सारख्या महाविद्यालयाने घवघवीत यश मिळालं आहे. तसेच लातूर शहरांमधील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकाल लागल्यापासून फक्त फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारे विद्यार्थी आणि शिक्षक ठिकठिकाणी दिसत आहेत. कोविड काळानंतर अशा प्रकारचे घवघवीत यश सेलिब्रेट करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा एकच जल्लोष दिसत आहे. 

ही बातमी वाचा :

NEET UG Result : नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये, पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
मतदानाच्या दिवशीच रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य; नाथाभाऊंचं भाजप घरवापसीचं नेमकं कारण सांगितलं!
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Monday Motivation : सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
सनी लिओनीच्या झगमगत्या आयुष्यामागचं अंगावर शहारे आणणारं सत्य; 'आयटम गर्ल'च्या आयुष्याचे 'हे' आहेत फंडे
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Embed widget