एक्स्प्लोर

मोठी बातमी! लातुरातील शिक्षकांकडे आढळले नीटच्या 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड; आतापर्यंत 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल!

Latur NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणी 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड आढळले आहेत.

Latur NEET Exam Paper Leak Case : लातूर : देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे (NEET Paper Leak Case) आता महाराष्ट्रात सापडले आहेत. लातुरातून (Latur) नांदेड एटीएसनं (Nanded ATS) दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं. त्या दोन्ही शिक्षकांविरोधात आता नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Exam) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या शिक्षकांची कसून चौकशी सुरू होती. अशातच या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, याप्रकरणी आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 

लातूर नीट घोटाळा प्रकरणी एटीएसनं या प्रकरणाची माहिती घेऊन लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले आहेत. हे अॅडमिट कार्ड पोलिसांनी पुढे पाठवलेले आहेत. आता हे कोणाकडे पाठवले आहेत? याची माहिती एटीएसनं दिलेली नाही. पण तरी या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची देखील एटीएसला शंका आहे. 

नीट पेपरफुटी प्रकरणी तपासाला वेग, दोन शिक्षकांविरोधात एफआयआर दाखल 

नीट पेपरफुटीप्रकरणी तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. नांदेड ATS नंतर लातूर पोलीसही सक्रिय झाले आहेत. नीटप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नाव आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. दरम्यान, या दोन शिक्षकांपैकी पठाण शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तक्रारीवरून ही एफआयआर नोंदवण्यात आली असून, त्यात एटीएसनं चौकशी केलेल्या दोन शिक्षकांनाही आरोपी केलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पोलिसांनी हा एफआयआर आयपीसीच्या कलम 420 आणि 120 (बी) आणि सार्वजनिक परीक्षा (प्रतिबंध आणि अन्यायकारक) च्या संबंधित कलमांखाली नोंदवला.

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले ते दोन शिक्षक कोण? 

नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोन शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील असून एका लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

दरम्यान, या दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. इतर राज्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार काय आहेत. किती आहेत याची माहिती तपासाअंती समोर येणार आहे. राज्यभरात कुठे कुठे यांचे कनेक्शन आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. मागील दोन दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली असल्याचं दिसून येत आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: वेतनाचे पैसे वळवले स्वतःच्या बँक खात्यात; पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाखांवर डल्ला; PSIसह चौघांवर गुन्हा, लातूर पोलिस दलातील घटना
वेतनाचे पैसे वळवले स्वतःच्या बँक खात्यात; पोलीस अधीक्षक कार्यालयात 2 कोटी 38 लाखांवर डल्ला; PSIसह चौघांवर गुन्हा, लातूर पोलिस दलातील घटना
उदगीर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू
उदगीर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनेत तीन ठार, 1 बेपत्ता; परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
Embed widget