एक्स्प्लोर

Latur News : महात्मा गांधींच्या नावानं यात्रा भरवणारं देशातलं एकमेव गाव, वाचा 'उजेड' गावची 71 वर्षांची परंपरा 

Latur News : लातूर जिल्ह्यात एक असं गाव आहे की, ज्या गावात 24 ते 30 जानेवारी दरम्यान 'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव' असतो.

Latur News : आज देशभर प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण लातूर जिल्ह्यात एक असं गाव आहे की, ज्या गावात 24 ते 30 जानेवारी दरम्यान 'राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सवा' चे आयोजन करण्यात येते. 'उजेड' असं त्या गावाचं नाव आहे. पाच दिवस हे गाव राष्ट्रप्रेमानं न्हाऊन निघतं. गावाला पूर्ण यात्रेचे रुप येतं. यात्रेनिमित्त घरोघरी पाहुणे येतात. लेकी बाळी येतात. दरवर्षी 24 जानेवारीला महात्मा गांधींच्या मूर्तीची स्थापना केली जाते. 

दरवर्षी या गावात महात्मा गांधी यात्रा महोत्सवानिमित्त सर्व रोग निदान शिबीर, रक्तदान शिबीर होते. येणारा प्रत्येक व्यक्ती मूर्तीला हार घालून नमस्कार करतो. गावात जागोजागी मिठाईची दुकाने थाटली जातात. जिलेबी तर क्विंटलने विकली जाते. टिपिकल यात्रेत दिसणारे वेगवेगळे रहाट पाळणे, स्पिकरवर देशभक्तीपर गीतं एकूणच राष्ट्रप्रेमाच्या चैतन्याने बहरलेलं वातावरण असते. 

ही परंपरा कशी आणि कधी सुरु झाली

गावातले लोक सांगतात की, स्वातंत्र्यपूर्व काळी गावात पिराची यात्रा भरायची. 1948 ला हैदराबाद मुक्ती संग्रामातील पोलीस अॅक्शननंतर ही यात्रा बंद झाली. 1950 ला देश प्रजासत्ताक झाल्यानंतर या गावातील लोकांनी एकत्र येऊन यात्रेबाबत मंथन केलं. त्यातून गावात पुन्हा यात्रा सुरु करायची ठरलं. पणती कोणाच्या नावाने सुरु करायची, सर्वांना मान्य असलेलं नाव ठरलं 'महात्मा गांधी' आणि या यात्रेची तारीख ठरली 26 जानेवारीचा आठवडा. अन नाव ठरले  'महात्मा गांधीबाबा यात्रा महोत्सव'. त्यानुसार 26 जानेवारी 1951 पासून या आगळ्या-वेगळ्या यात्रेला सुरुवात झाली. 

50 ते 60 क्विंटल साखरेची जिलेबी विकली जाते 

त्याकाळी गावचे पहिले सरपंच शिवलिंग स्वामी होते. तसेच त्या काळातील गावची असामी चांद पटेल, रामराव रेड्डी, गोविंद मास्तर, माधवराव जाधव, विश्वंभरराव पाटील, अण्णाराव बिराजदार,गोविंदराव चिमनशेट्टे, व्यंकटराव ढोबळे, अंबादास जाधव या सर्व गावकऱ्यांनी ही यात्रा करायचे ठरवले.  ना कोणत्या देवाची, ना कोणत्य धर्माची, आपण लोकशाहीची यात्रा महात्मा गांधीबाबांच्या नावाने 26 जानेवारीला सुरु करायची ठरवले. तेव्हापासून  कोविडचे दोन वर्षे अपवाद सोडून सगळे गाव एकत्र येऊन सार्वजनिकरित्या वर्गणी गोळा करून ही यात्रा भरवण्यात येते. येणारा प्रत्येक माणूस महात्मा गांधीच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो. या यात्रेत 50 ते 60 क्विंटल साखरेची जिलेबी विकली जाते, असं ग्रामस्थ सांगतात. लातूर शहरात पण 26 जानेवारीला रस्त्यारस्त्यावर जिलेबीचे स्टॉल लागतात. प्रजासत्ताक दिन म्हणजे जिलेबी खाऊन तोंड गोंड करायलाच हवं अशी परंपराच इथे पडलेली आहे. 26 जानेवारीला देशभर प्रचंड उत्साह असतो..  पण 'उजेड' सारखा उत्सव देशात कुठेच होत नाही.

पाच दिवस असते कार्यक्रमाची रेलचेल

यावर्षीच्या यात्रा महोत्सवाची सुरुवात 23 जानेवारी रोजी ग्रामस्वच्छतेने झाली. 24 जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यानंतर सर्व रोग निदान आणि उपचार शिबिर, रक्तदान शिबिर झाले. बुधवारी 25 जानेवारी रोजी शालेय क्रीडा स्पर्धा आणि भजन (दरवर्षी पशु चिकित्सा होते पण यावर्षी लम्पीमुळं रद्द केल्याचे सांगितले.) स्पर्धा झाली.

27 जानेवारीला जंगी कुस्त्याचे सामने

आज म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी झेंडावंदन प्रभात फेरी, संगीतवाद्य गायन तसेच बक्षीस वितरण केले जाते. रात्री 9 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम होतात. 27 जानेवारीला जंगी कुस्त्याचे सामने, तसेच रात्री सेवालय संस्थेच्या वतीनं हॅपी म्युझिक शो होतो. तर 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून यात्रेचा समारोप होतो.

गेल्या 71 वर्षापासून यात्रेची परंपरा

उजेड म्हणजे प्रकाश पेरणारे गाव. लोकशाहीचा महोत्सव करणारे गाव. गेली 71 वर्षे अविरतपणे गावपातळीवर 8 हजार लोकसंख्या असलेल्या गावात अशी जत्रा भरते. खरं वाटणार नाही. एकबार अनुभव घ्या आणि गांधी बाबाच्या जत्रेला जाच. लातूर शहरापासून 60 किलोमीटर एवढ्या अंतराव उजेड ( हिसामाबाद ) हे गाव येते. एक आगळावेगळा अनुभव आहे. एक गाव लोकशाहीचा आनंदोत्सव गेली सात दशक साजरा करत आहे. हे प्रचंड आनंद देणारी गोष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Gandhi Yatra: इथं कुठल्या देवाची नाही तर गांधी बाबाची यात्रा भरते; लातूरमधील उजेड गावची अनोखी कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Embed widget