Latur News : लातूरच्या ट्युशन एरियामध्ये पोलिसांचे मोठं कोम्बिग ऑपरेशन; 33 जणांवर कारवाई
Latur Tution Area : 10 पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचारी वाहनांचा ताफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कोम्बिग ऑपरेशन केले.

लातूर : लातूर (Latur) येथील ट्युशन एरियात (Tution Area Latur) पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन (Police Combing Operation) केले. चार पोलीस ठाण्याचे 55 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कोंबिंग ऑपरेशन पार पाडलं. यामध्ये 10 पोलीस अधिकारी आणि 45 पोलीस कर्मचारी वाहनांचा ताफा यांनी एकत्रित येत लातूर येथील ट्युशन एरियामध्ये (Tution Area Latur) कारवाई केली. यामध्ये 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यामध्ये लातूर शहर शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखला जातो. राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. लातूर येथील ट्युशन एरियामध्ये यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असते. याच ठिकाणी काही असामाजिक तत्त्व सक्रिय झाली आहेत.
नशेच्या आहारी जाणारे विद्यार्थी, चोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. गुंडगिरी करणे, मुलींची छेड काढणे, या भागांमध्ये विनाकारण फिरत राहणे आदी अशा स्वरूपाचे गुन्हे इथे नित्यनेमाने घडत असतात. या भागातील असामाजिक तत्त्वांवर वचक बसावा यासाठी लातूर शहरातील पोलिसांनी एकत्रित येत ही कारवाई केली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि विवेकानंद पोलीस ठाणे येथील अधिकारीनी यात सहभाग घेतला होता. या कोंम्बिग ऑपरेशन दरम्यान या भागांमध्ये विनाकारण फिरणारे आणि गुंडगिरी करणाऱ्या 33 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
ट्युशन एरिया मध्ये अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्यामुळे या भागात सातत्याने गुंडगिरी करणाऱ्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या कोम्बिग ऑपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
