एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

मुलांना हेरायचं, पैसे उकळायचे अन् पेपर पुरवायचे; नीट परीक्षेचा काळाबाजार; लातूरमधील पेपरफुटी प्रकरणाचं भीषण वास्तव!

Latur NEET Exam Scam : लातूर घोटाळ्यात संशयित असलेल्या इतर तीन जणांच्या घरातून पोलिसांनी 6 मोबाईल आणि 12 विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं जप्त केली आहेत.

Latur NEET Exam Paper Leak: लातूर : नीट पेपरफुटीचं (NEET Paper Leak Case) जाळं थेट महाराष्ट्रापर्यंत (Maharashtra News) पसरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आणि सर्वांना धक्का बसला. नीट (NEET Exams) गैरव्यवहार प्रकरणातला लातूर पॅटर्न (Latur News) उघड झाला. लातूर पोलिसांनी याप्रकरणी आता तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे. संजय जाधव आणि जलील पठाण या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना नांदेड एटीएसनं अटक केली आहे. पोलिसांनी जाधव, पठाण आणि उमरगा आयटीआयमध्ये नोकरीस असलेल्या इरान्ना कोनगलवार यांच्या घराची झडती घेतली. त्यात 'नीट'च्या 12 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी, 5 लाख रूपयांच्या मोबदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवून द्यायचे, असा खळबळजनक खुलासा पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. 

लातूर घोटाळ्यात संशयित असलेल्या इतर तीन जणांच्या घरातून पोलिसांनी 6 मोबाईल आणि 12 विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं जप्त केली आहेत. आर्थिक व्यवहाराचा मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडेच्या शोधासाठी पोलीस दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. तसेच, या घोटाळ्यात पोलिसांच्या संशयानुसार, नीट पेपरच्या गोरखधंद्यात कोण, कोणती भूमिका बजावत होतं? याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्यानुसार सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, नीट पेपरचा गोरखधंडा लातुरातून थेट दिल्लीपर्यंत सुरू होता. 

आरोपींपैकी कोण, काय आणि कसं करत होतं नीट पेपरचा घोटाळा? 

पोलिसांना आतापर्यंत हाती लागलेल्या पुरावे आणि माहितीवरुन त्यांनी याप्रकरणात काही अंदाज बांधले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर... 

लातुरातील नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींची नावं समोर आली आहेत. आरोपींनी एक साखळी तयार केली होती आणि प्रत्येकानं आपापली कामं ठरवून घेतली होती. अटकेत असलेला पहिला आरोपी जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा, त्यानंतर त्यांना आमिष दाखवायचा आणि विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवल्यानंतर त्यांना रेट द्यायचा. परीक्षेचे गुण वाढवण्यासाठी तब्बल 5 ते 7 लाख रुपये हे टोळकं विद्यार्थ्यांकडून उकळायचं. काही पैसे विद्यार्थ्यांकडून अॅडव्हान्स म्हणून घेतले जायचे आणि त्यानंतर विद्यार्थी त्यांचं हॉलतिकीट द्यायचे, ते हॉलतिकीट आरोपी संजय जाधवकडे पाठवलं जायचं. 

अटकेत असलेला दुसरा आरोपी शिक्षक संजय जाधव त्याच्याकडे असलेल्या दोन मोबाईल्सवरुन इच्छुक विद्यार्थ्यांची हॉलतिकीटं आणि अॅडव्हान्स घेतलेले पैसे जमा करुन इसन्नाकडे पाठवून द्यायचा, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर पुढे इसन्ना त्याच्याकडे आलेला डेटा आणि पैसे दिल्लीत राहणाऱ्या मुख्य सूत्रधार गंगावर मुंडे याच्याकडे पाठवायचा. त्यानंतर त्या-त्या विद्यार्थ्यांचे गुण वाढून येईपर्यंत पाठपुरावा करायचा, असाही आतापर्यंतच्या तपासातून पोलिसांनी अंदाज बांधला आहे. 

दिल्लीत राहणारा गंगाधर मुंडे हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. ज्या मुलांचे पैसे मिळालेत त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणं, त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणं ही सर्व कामं गंगाधर मुंडे पाठपुरावा करायचा करायचा, असं गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅकेट काम करत होतं, असा संशय पोलिसांना आहे. 

पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय जाधवकडून 2, पठाणकडून 3 तर इसन्नाकडून एक मोबाईल जप्त केला आहे. आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी तिघांचे बँक पासबुक जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काही सांकेतिक भाषेत मेसेज आहेत, ते तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. 

पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण? 

नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे. 

पाहा व्हिडीओ : NEET Paper Leak Case :मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक;फरार जिल्हापरिषद शिक्षकाला बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP MajhaMaharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Embed widget