दहिहंडी फोडण्यासाठी सर्वात शेवटचा थर गाठला, 17 वर्षीय तरण्याबांड गोविदांचा मृत्यू, मुंबईत 2 गोविंदा सिरीयस तर 238 जण जखमी
Latur : दहिहंडी फोडताना जखमी झालेल्या आणखी एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अहमदपूर येथे काल रात्री दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थर कोसळून जखमी झालेल्या गोविंदाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
Latur : दहिहंडी फोडताना जखमी झालेल्या आणखी एका गोविंदाचा मृत्यू झालाय. अहमदपूर येथे काल रात्री दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थर कोसळून जखमी झालेल्या गोविंदाचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये काल एका गोविंदाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता, त्यानंतर लातूरमधील आणखी एका गोविंदाचा मृत्यू झालाय. याशिवाय मुंबईत 2 गोविंदा सिरीयस असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 238 गोविंदा जखमी आहेत.
दरवर्षी योद्धा प्रतिष्ठान मार्फत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात काल रात्री दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी योद्धा प्रतिष्ठान मार्फत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यासाठी भव्य बक्षीसही देण्यात येते. जिल्हाभरातून अनेक संघ यात सहभाग घेत असतात. दरम्यान, 17 वर्षीय तरण्याबांड गोविंदाचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यरात्री पोटात दुखत असल्यामुळे त्याला लातूर येथे हलविण्यात आले होते
अहमदपूर येथील काल झालेल्या स्पर्धेत साठे नगर भागातील एका गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. यात उदय महेश कसबे हा सतरा वर्षाचा नवतरुण मुलगा सहभागी झाला होता. शेवटच्या थरावर तो गेला आणि तोल ढासळून खाली पडला होता. यात जबर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर अहमदपूर येथे उपचार करण्यात आले होते. मध्यरात्री पोटात दुखत असल्यामुळे त्याला लातूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे.
उदय थरावरच्या सर्वात वर होता. थर कोसळला आणि उदय खाली पडला. त्याच्या छातीला आणि किडणीला जबर दुखापत झाली होती. ही दुखापत अंतर्गत होती. लवकर लक्षात आली नाही. रात्री उदय यास खूप शारीरिक त्रास झाला. उलटी झाल्यामुळे त्यास लातूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळतच उदय याचा मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्याची आयोजकांवर गुन्हा दखल करण्याची मागणी आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली आहे. मृतदेह अहमदपूर येथे पाठण्यात आला आहे. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Shivaji Maharaj Statue: जयदीप आपटे RSS चा माणूस, त्यामुळे ब्राँझचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप