Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीचेही अर्धनग्न फोटो काढले; लातूरमधील संतापजनक प्रकार
Latur Crime News : पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Udgir Rural Police Station) दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीचेही अर्धनग्न फोटो काढले; लातूरमधील संतापजनक प्रकार Latur Crime News Sexual assault on women minor girl was also photographed half naked Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीचेही अर्धनग्न फोटो काढले; लातूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/29/cf024c8d65c8b4bea4ef84ca21788a761690610331240653_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर महिलेवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेवर अत्याचार केल्यावर तिच्या अल्पवयीन मुलीचेही अर्धनग्न फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी 33 वर्षीय पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात (Udgir Rural Police Station) दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहाँगीर कुरेशी व अजीम कुरेशी असे आरोपींचे नावं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, जहाँगीर कुरेशी व अजीम कुरेशी या दोघांनी महिलेला मागील गुन्ह्याच्या कारणावरून त्रास देण्यास सुरवात केली होती. पुढे हा प्रकार आणखीच वाढला आणि दोन्ही आरोपींनी शारीरिक व मानसिक त्रास देऊन केस मागे घेण्याबाबत धमकावून पीडित फिर्यादी महिलेवर जबरी संभोग केला. तसेच, फिर्यादीच्या मुलीस मोटारसायकलवरुन बळजबरीने घेऊन जाऊन तिची छेड काढली. तसेच, तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून केस मागे न घेतल्यास तिचे अर्धनग्न फोटो व्हायरल करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे पिडीत महिला प्रचंड घाबरून गेली आणि तिने पोलिसांत धाव घेतली.
'या' कलमांखाली गुन्हा दाखल...
दरम्यान, या सर्व प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी जहाँगीर कुरेशी व अजीम कुरेशी यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवार गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यात गु. र. नं. 641 / 23 कलम 376 (ड), 363, 354 ( ब ), 323, 504, 506, 34 भा. दं. वि. आणि सहकलम 9,12 पोक्सो, कलम 3 (2) (5) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत हे करीत आहेत.
हातातील कागदपत्रे घेऊन शिवीगाळ केली...
पिडीत महिलेने यापूर्वी दाखल केलेला एक गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी दोन्ही आरोपींकडून तिच्यावर दबाव होता. मात्र, महिलेने याला नकार दिल्याने तिच्यासह तिच्या मुलीस रस्त्यात अडवून त्यांच्यासोबत वाद घालून त्यांच्या हातातील कागदपत्रे घेऊन शिवीगाळ केली. तसेच, दोन्ही आरोपींनी पिडीत महिलेवर जबरी संभोग केला. तर, फिर्यादीच्या मुलीस मोटारसायकलवरुन बळजबरीने घेऊन जाऊन तिची छेड काढली. त्यामुळे महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीला संपवलं; संभाजीनगरमधील मन सुन्न करणारी घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)