Latur Car Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, उदगीर निलंगा मार्गावर थरार, चौघांचा मृत्यू, घटनास्थळी मोठी गर्दी
Latur Car Truck Accident : लातूर जिल्ह्यातील उदगीर निलंगा मार्गावर झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत हे मध्य प्रदेश राज्यातील आहेत.
लातूर : राज्यातील रस्ते अपघाताचं (Road Accident) प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. लातूर (Latur Accident) जिल्ह्यातील उदगीर निलंगा (Udgir Nilanga State Highway) राज्य मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार आणि ट्रकची धडक झाली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच बचावकार्य सुरु केलं, जेसीबीच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहनं बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मध्य प्रदेश येथील कापड व्यापारी आणि त्यांचे इतर सहकारी हे इर्टिका कारनं प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. भरधाव कार आणि वेगाने येणाऱ्या ट्रक मध्ये झालेल्या धडकेत कारचा चेदामेंदा झाला होता. प्राथमिक माहितीनुसार कार मधील चार जण जागीच ठार झाले आहेत. निलंगा उदगीर राज्य मार्गावरील धनेगाव येथे हा अपघात झाला होता.
मध्य प्रदेश येथील कापड व्यापारी संजय जैन आणि त्यांचे तीन सहकारी हे एमपी 09 डीई 5227 ही इर्टिका कार ही वलांडी हून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 25 जे 7365 याची जोराची धडक बसली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रक आणि कार मधील अपघाताची माहिती मिळताच देवणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं दाखलं झाले. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातातील मृतांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. यानंतर पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरु होता. पोलिसांनी या काही वेळातचं या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली. ट्रक आणि कारच्या धडकेनंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबी देखील घटनास्थळी आणला होता. जेसीबीच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन दूर करण्यात आली. अपघात झाला त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, राज्यात वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचं पालन केलं जात नसल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं.
संबंधित बातम्या :