एक्स्प्लोर

मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद

शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसलाय.

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी अर्ज छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आक्षेप घेतल्याने उमेदवारांचे अर्ज बाद ठरत आहेत. मुंबईतील दोन प्रभागात भाजप उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्येही (Pune) भाजपच्या तीन उमेदवारांना फटका बसला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena)मोठा धक्का बसला आहे. येथील प्रभाग 24 मधील भाजपच्या तीन जागेवरील आणि शिंदेंच्या शिवसेना पक्षातील दोन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, आता येथील उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. 

शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंच्या प्रभागात युतीत स्वबळावर लढणाऱ्या दोन्ही पक्षांना हा मोठा फटका बसलाय. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर हे पाचही एबी फॉर्म जमा झाले होते. त्यावर विरोधी उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आजच्या छाननीमध्ये एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. आता, या जागेवर पाचही उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. आता हे पाहता प्रभाग 24 मध्ये कमळ चिन्हाचा फक्त एकचं उमेदवार असेल तर शिंदे शिवसेनेचे दोन उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर लढतील. त्यामुळे, येथील भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवावी लागणार असून पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईत भाजपचे 2 ठिकाणी अर्जच नाहीत

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपच्या उमेदवाराचा अर्ज हा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे स्वीकारण्यात आला नाही. खुल्या प्रवर्गातील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्जही स्वीकारण्यात आला नव्हता. . मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी भाजपने एकप्रकारे अर्जच भरलेले नाहीत. त्यामुळे भाजपने या दोन वॉर्डांमध्ये इतर पक्षांना बाय दिल्याची चर्चा आहे.

मुंबईत ठाकरेंच्या 5 उमेदवारी अर्जावर आक्षेप

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गटाची धाकधूक वाढली असून त्यांच्या 5 उमेदवारांच्या उमेदवारी धोक्यात असल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या पाच उमेदवारांच्या अर्जावर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे, मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 41, 42 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवारांचा एबी (AB)फॉर्मवर डिजिटल सही असल्याचं निदर्शनास आले. या एबी फॉर्मवर डिजिटल सही असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला. 

हेही वाचा

मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget