एक्स्प्लोर

Narsing Udgirkar : लातूरमध्ये तिरंगी लढत, सव्वा लाख मतं घेणाऱ्या वंचितकडून उदगीरकरांना तिकीट; मविआचं टेन्शन वाढलं!

वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत एकूण 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

लातूर : वंचित बहुजन आघाडीने (Vancht Bahujan Aghadi) यंदाची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने नुकतेच 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने माढा, सोलापूर (Solapur) यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातही या पक्षाने नरसिंग उदगीरकर (Narsing Udgirkar) यांना तिकीट दिले आहे. उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची (Latur) तिरंगी लढत होणार असून येथे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकते. सध्या या जागेवर भाजपचा खासदार आहे.

नरसिंग उदगीरकर यांना तिकीट

लातूर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत.ही जागा आपल्याच ताब्यात यावी, यासाठी प्रत्येकाचा आग्रह असतो. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून या पक्षाने येथे नरसिंग उदगीरकर यांना तिकीट दिले आहे. ते मुळचे उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवाशी आहेत.

राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी केला होता प्रयत्न 

लातूर हा राखीव लोकसभा मतदारसंघा त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना आता वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

2019 साली वंचितला1 लाख 12 हजार मते

उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकपदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. यावेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. दरम्यान 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने येथून राम गारकर यांना तिकीट दिले होते. त्यांना एकूण एक लाख 12 हजार मते मिळाली होती.

महाविकास आघाडीला बसू शकतो फटका

लातूर हा गड कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. वंचितने या जागेवर उमेदवार उभा केल्यामुळे मतफुटी होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका मविआच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी 

  1. हिंगोली : डॉ. बीडी चव्हाण
  2. लातूर : नरसिंगराव उदगीरकर
  3. सोलापूर : काशिनाथ गायकवाड
  4. माढा :  रमेश नागनाथ बारस्कर
  5. सातारा : मारुती धोंडीराम जानकर
  6. धुळे : अब्दुर रहमान
  7. हातकणंगले : दादासाहेब दादागौडा चौगौडा पाटील
  8. रावेर : संजय पंडित ब्राह्मणे
  9. जालना : प्रभाकर देवमन बाकले
  10. मुंबई उत्तर मध्य : अब्दुल हसन खान
  11. रत्नागिर- सिंधुदुर्ग : काका जोशी

हेही वाचा >>

प्रकाश आंबेडकरांकडून वंचितची दुसरी यादी जाहीर, माढातून रमेश बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर रिंगणात 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News 11 PM Top Headlines 11 PM 30 March 2025 रात्री 11 च्या हेडलाईन्सRich Thief Story Special Report : अट्टल चोराचा 1 कोटींचा बंगला,लोकांना लुटून श्रीमंत होणारा गजाआडRaj Thackeray Speech : औरंगजेबची कबर दिसली पाहिजे,  राज ठाकरेंची सर्वात मोठी मागणी ABP MAJHAChhattisgarh Naxalite : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Credit Card :किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांवर, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू, शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 5 लाखांवर, नव्या आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी सुरु होणार
प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकातील उतारा वाचून दाखवला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
मराठी माणसांचा मुद्दा मांडला, राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना कार्यक्रम दिला, म्हणाले उद्यापासून बँकेत जा...
Raj Thackeray VIDEO: राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', गंगेच्या प्रदूषणावर हल्लाबोल; ठणकावून सांगितलं, मला हिंदुत्व शिकवू नका
Aniket Verma : वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, अनिकेत वर्माला काकांनी सांभाळलं, हैदराबादला हिरा कसा मिळाला?
ट्रेविस हेड ते ईशान किशन फेल, अनिकेत वर्मानं ढासळणारा बालेकिल्ला सांभाळला, हैदराबादचा नवा स्टार कोण?
F-1 Visa : 'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
'स्वतः देश सोडा, नाहीतर...', F-1 व्हिसावर शिकणाऱ्या अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना धडकी भरवणारा ईमेल
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
ChatGPT वरुन फोटो बनवण्याचा ट्रेंड, घिबलीचं जपान कनेक्शन, अ‍ॅनिमेशन स्टुडिओच्या मालकाचं वक्तव्य, मला पूर्ण वैताग...
Indigo Airline: इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
इंडिगोला आयकर विभागाचा दणका, पेरेंट कंपनीला 944 कोटींचा दंड, नोटीस मिळताच कंपनीची भूमिका समोर
Pragya Singh Thakur : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द, नेमकं कारण काय?
Embed widget