एक्स्प्लोर

Latur Accident : ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग; सात वाहनं जळून खाक, जीवितहानी झाल्याची भीती

Latur Accident : लातूरमधून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला ऊसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं आणि यात सात वाहन जळून खाक झाली.

Latur Accident : लातूरमध्ये (Latur) झालेल्या एका अपघातात सात वाहनं (Vehicles) जळून खाक झाली आहेत. भातखेडा इथल्या मांजरा नदीच्या पुलाच्या पुढे ही घटना घडली. सुरुवातीला लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला (Diesel Tanker) ऊसाच्या ट्रॅक्टरने ( Sugarcane Tractor) जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं आणि यात सात वाहन जळून खाक झाली आहेत. दरम्यान या घटनेत किती लोक जखमी झाले, किती लोक भाजले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथकं घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर-उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. लातूर शहरातून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे.

सात वाहनांचा कोळसा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 च्या विस्तारीकरणाचं काम सुरु आहे. यामुळे वळण रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. त्याच अरुंद रस्त्यावर हा अपघात झाला. यामुळे कमी जागेत जवळ आलेली वाहनं एकापाठोपाठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या वाहनांमध्ये ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टँकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी महामंडाळाची बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्रॉली नसलेले वाहन यांचा समावेश आहे. 

आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाची दमछाक 
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आलं. डिझेल टँकरला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाची चांगलीच दमछाक झाली होती. त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागला. एसटी महामंडळची बस आणि दोन कार जागेवर जळून खाक झाल्या.

अपघातातील लोक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती हाताळली. तीन अग्निशमन दलाच्या गाड्या, पाच रुग्णवाहिका आणि मोठ्या प्रमाणात हजर असलेल्या पोलिसांनी पुढील हानी टाळण्यासाठी प्रयत्न केले. डिझेल टँकरची आग विझली असली तरी त्यात केव्हाही स्फोट होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात असल्यामुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे. या घटनेतील किती लोक जखमी आहेत किंवा मृतांचा आकडा अद्याप समजू शकत नाही. प्रथम दक्षता म्हणून आम्ही यातील लोकांना तात्काळ उपचारासाठी पुढे पाठवलं आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी दिली आहे.

VIDEO : Latur Tanker Accident : पेट्रोल टँकर आणि ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक, टँकर पेटला ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 
जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 
25 IAS Officers Transfer Of Maharashtra: मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरपर्यंत...राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत...राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget