एक्स्प्लोर

Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'

अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र मिशननेही तालिबान सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचा देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे मिशनने म्हटले आहे.

Afgan Women Nursing Barred : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षणावर बंदी घातली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, काबूलमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली ज्यामध्ये तालिबान सरकारचा निर्णय जाहीर करण्यात आला. अफगाणिस्तानमधील आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही, परंतु बैठकीदरम्यानच त्यांना सांगण्यात आले की महिला आणि मुली यापुढे या संस्थांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाहीत. यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही.

तालिबानच्या या निर्णयाचा अफगाणिस्तानवर खोल परिणाम होईल

क्रिकेटपटू राशिद खानने (Rashid Khan on Afgan Women Nursing Barred) तालिबानच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आणि सांगितले की तालिबानच्या या निर्णयाचा अफगाणिस्तानवर खोल परिणाम होईल. कारण देशात आधीच वैद्यकीय आणि पॅरामेडिकल स्टाफची कमतरता आहे. रशीदने लिहिले की, इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे, जे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील महिलांसाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था बंद केल्याने मला खूप दुःख झाले आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला की, मुलींना वैद्यकीय शिक्षणापासून बंदी घालण्याचा निर्णय योग्य नाही. इस्लामने नेहमीच सर्वांसाठी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. ॲम्नेस्टीने अफगाणिस्तानमध्ये माता मृत्यू दर सर्वाधिक आहे, तो आणखी वाढेल.

संयुक्त राष्ट्र मिशननचे पुनर्विचार करण्याचे आवाहन 

अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र मिशननेही तालिबान सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचा देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि विकासावर नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मिशनने म्हटले आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे की, अफगाणिस्तानात सर्वाधिक महिलांचा मृत्यू मुलांना जन्म देताना होतो. देशात आधीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तालिबानच्या या निर्णयाचा देशावर विनाशकारी परिणाम होणार आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, तालिबानच्या या निर्णयामुळे देशातील महिलांसाठी शिक्षणाचा शेवटचा मार्गही बंद झाला आहे. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. तेव्हापासून त्यांनी महिलांवर अनेक बंधने लादली. सर्वप्रथम वेगवेगळ्या सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या. त्यानंतर त्याच्या अभ्यासावर बंधने आली. अफगाणिस्तानमध्ये महिला केवळ सहाव्या इयत्तेपर्यंतच शिक्षण घेऊ शकतात.

अफगाणिस्तानचा शरिया कायदा काय आहे?

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर देशात शरिया कायदा लागू केला जाईल, असे तालिबानने म्हटले होते. वास्तविक, इस्लामला मानणाऱ्या लोकांसाठी शरिया ही एक कायदेशीर व्यवस्था आहे. अनेक इस्लामिक देशांमध्ये याचा वापर केला जातो. मात्र, पाकिस्तानसह बहुतांश इस्लामिक देशांमध्ये त्याची पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. त्यात दैनंदिन जीवनापासून अनेक मोठ्या समस्यांवरील कायदे आहेत. शरियामध्ये कुटुंब, वित्त आणि व्यवसायाशी संबंधित कायदे समाविष्ट आहेत. दारू पिणे, अंमली पदार्थांचा वापर करणे किंवा तस्करी करणे हे शरिया कायद्यातील प्रमुख गुन्ह्यांपैकी एक आहे. यामुळेच या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेचे नियम आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget