Latur : शिंदाळा येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील शिंदाळा हे गाव औसा तालुक्यात येते. या गावातील 85 वर्षे शेतकरी रावसाहेब शिवराम घोडके यांनी आत्महत्या केली आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लातूर : शिंदाळा येथील एका 85 वर्षीय प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने (Farmer Sucide) शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या मतानुसार, वीजनिर्मिती करणाऱ्या महाजनको कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे. दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले,
लातूर जिल्ह्यातील शिंदाळा हे गाव औसा तालुक्यात येते. या गावातील 85 वर्षे शेतकरी रावसाहेब शिवराम घोडके यांनी आत्महत्या केली आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार आत्महत्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली आहे. त्यांच्या आत्महत्येला महाजनको जबाबदार आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प ठिकाणी महाजनको कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. मात्र महाजनकोकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून रावसाहेब घोडके यांनी आत्महत्या केल्याचं च कुटुंबीयांचे मत आहे. महाजनकोविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन देखील केले. त्या आंदोलनामध्ये रावसाहेब यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून त्यांचा मुलगा पोलिसांपासून वाचण्यासाठी गाव सोडून गेला आहे. या नैराश्यतून त्यांनी आत्महत्या केली आहे
औसा तालुक्यातील शिंदाळा (लो.) येथे नियोजित भेल व महाजनकोच्या वायू विद्युत प्रकल्पासाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या होत्या. त्यात रावसाहेब घोडके यांचीही 5 हेक्टर 71 आर एवढी जमीन जवळपास 10 ते 12 वर्षांपूर्वी संपादित झाली होती. जमिनी संपादित करतावेळी प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून वायू विद्युत प्रकल्प झालाच नाही. उलट त्याचे रूपांतर सौर ऊर्जा प्रकल्पात झाले आहे..
काल दुपारी रावसाहेब यांनी आत्महत्या केल्याचा समोर आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण तयार झाले होते. जोपर्यंत यातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचं नाही असा निर्धार प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांनी कालच केला होता.भादा पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Kalyan Crime News : आधी खून, मग आत्महत्येचा बनाव; पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे फुटलं आईच्या हत्येचं बिंग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
