Lalit Prabhakar : ललित म्हणतोय "तुझ्या स्टेटसला लाव फोटो माझा"; नेमकं प्रकरण काय?
Lalit Prabhakar : ललित प्रभाकरचा 'टर्री' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Lalit Prabhakar Tarri Movie : मैत्रीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. आपण नेहमी ऐकत आलोय की मैत्री हे अतूट नाते असते, कधी न तुटणारे बंधन असते. अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आपल्या खास मित्राला ‘तुज्या स्टेटस ला, लाव फोटो माझा’ असं म्हणत फुल ऑन राडा घालणार आहे. आपल्या मैत्रीसाठी ललित काय ‘टर्री’गिरी करणार हे येत्या 17 फेब्रुवारीला ‘टर्री’ (Tarri) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेते महेश रावसाहेब काळे यांनी यांनी ‘टर्री’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ललितने सिनेमातील नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"तुझ्या स्टेटसल लाव फोटो माझा...आता लाव ताबडतोब... भाई आलंय आपलं पहिलं गाणं..."लाव फोटो माझा".
ललित प्रभाकरचं 'लाव फोटो माझा' हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. ललितच्या व्हिडीओवर नाद करायचा नाय, आपल्या दोस्तीचा, एकदम तडका, टर्री, भावा शुभेच्छा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
क्षितीज पटवर्धन याने लिहिलेल्या या धमाल गाण्याला अवधूत गुप्ते, मनीष राजगिरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले यांचा संगीतसाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्यातून दोन जीवाभावाच्या मित्रांची घट्ट मैत्री दिसून येते.
View this post on Instagram
'टर्री’ या सिनेमात संग्राम आणि पै यांच्या मैत्रीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर आणि योगेश डिंबळे यांनी या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभी राहत या दोघांनीं आपली मैत्री जपली आहे. अचानक या मैत्रीमध्ये वादळ निर्माण होतं याचा सामना हे दोन मित्र कसे करतात? या सिनेमात पहायला मिळणार आहे.
मजा, मस्ती, आणि नात्यामधला ओलावा जपताना 'टर्री’ कशाप्रकारे प्रत्येक कठिण प्रसंगामध्ये उभा राहतो? हे पहाणं रंजक असल्याचं, ललित म्हणाला. या सिनेमात ललित प्रभाकर सोबत अभिनेत्री गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या