Rajyog : तब्बल 50 वर्षांनंतर बनले 'लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार अपार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तब्बल 50 वर्षांनंतर लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य राजयोग बनले आहेत. या दोन योगांमुळे काही राशीच्या लोकांना बक्कळ लाभ होणार आहे आणि या राशींचे अच्छे दिन सुरू होणार आहेत.
Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाने 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रह मीन राशीत पोहोचताच त्याचा सूर्य आणि शुक्राशी संयोग झाला आहे. त्याचबरोबर मीन राशीमध्ये शुक्र आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग (Laxmi Narayan Rajyog) तयार होत आहे, तर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार होत आहेत.
तब्बल 50 वर्षांनंतर एकाच राशीत या दोन राजयोगांची निर्मिती एकाच वेळा झाली आहे. दोन राजयोगांच्या युतीमुळे हा काळ काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे, या काळात त्यांच्या संपत्तीत अफाट वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया
मेष रास (Aries)
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी, तुम्हाला करिअरच्या आघाडीवर चांगलं यश मिळेल आणि करिअरमध्ये तुमची व्याप्ती वाढवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोललो, तर तुमचं तुमच्या जोडीदारासोबतचं नातं चांगलं राहील. तुम्हाला समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. तसेच, यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.
वृषभ रास (Taurus)
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि परदेशातूनही व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच निर्यात आणि आयातीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
सिंह रास (Leo)
लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही लहान किंवा मोठा प्रवास देखील करू शकता, जो शुभ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :