एक्स्प्लोर

मतदानाआधी Koo अॅपचा मोठा पुढाकार, अधिकार आणि कर्तव्यांबद्दल बहु-भाषिक मार्गदर्शकाद्वारे मतदारांना बनवणार सक्षम

कू मतदार मार्गदर्शका'चे उद्दिष्ट आहे मतदारांना अधिकार आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुक करणे सोबतच लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास दृढ करणे हेसुद्धा त्यातून साध्य होईल.

koo App update :  राष्ट्रीय मतदार दिनापूर्वी, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म - Koo कू - ने मतदारांचे हक्क आणि कर्तव्याबाबत बहुभाषिक मार्गदर्शक आणले आहे. या मार्गदर्शकाचा हेतू आहे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना डोळस निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवणे. 'कू मतदार मार्गदर्शक' भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या भारतीय मतदाराच्या मूलभूत अधिकारांवर लक्ष केंद्रित करते. मतदारांनी मतदान करण्यापूर्वी आणि नंतर विचारात घेणे आवश्यक असलेल्या कर्तव्यांनाही ते ठळक करते. यातून Koo अॅपचे प्रयत्नही समोर येतात. पारदर्शक, निःपक्षपाती आणि विश्वासार्ह सोशल मीडिया मध्यस्थ म्हणून कू काम करते आहे. मतदार जागरूकता वाढवण्यासह निवडणूक प्रक्रियेवरचा मतदारांचा विश्वास दृढ करण्यासाठी 'कू मतदार मार्गदर्शक' हिंदी, मराठी, पंजाबी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. पहिल्यांदाच मतदान करणार असलेल्या राज्यांतील मतदारांना लाभ देण्यासाठी. 

'राष्ट्रीय मतदार दिन - 2022' ची थीम आहे. "मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता' ही थीम लक्षात घेत, 'कू मतदार मार्गदर्शक' लोकशाहीचा मध्यस्तंभ म्हणून मतदानाचे महत्त्व आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकांसाठी मतदार साक्षरता वाढवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार करते.  यासंदर्भाने 'कू'चे सीईओ आणि सह-संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, 'मतदान हा लोकशाहीत सर्व नागरिकांना दिला गेलेला मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक मत स्वत:चे महत्त्व राखून असते. प्रथमच मतदान करणार्‍या मतदारांनी या महत्त्वपूर्ण अधिकाराचा न्याय्य पद्धतीने वापर करावा यासाठी त्यांना सक्षम व शिक्षित करणे गरजेचे असते. त्याच हेतूने आम्ही 'राष्ट्रीय मतदार दिना'ला डोळ्यांसमोर ठेवत हे माहितीपूर्ण 'कू मतदार मार्गदर्शक' सादर करतो आहोत. भारताच्या भाषिक वैविध्याला सलाम करणारा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून, प्रत्येक मतदाराचे ज्ञान अधिक समृद्ध करण्यासह एकुण निवडणूक प्रक्रियेत अधिक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हे मार्गदर्शक चार भाषांमध्ये प्रसिद्ध केले आहे. एक निष्पक्ष, मुक्त आणि विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून, Koo अॅपने इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) द्वारे तयार केलेल्या 'स्वैच्छिक आचारसंहिते'वर स्वाक्षरी केली आहे. 'कू' ला निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाचा वापर पारदर्शकपणे होणे अपेक्षित आहे. समाजात सकारात्मक आणि प्रगतीशील बदल घडवून आणण्यासाठी कू अॅपचा योग्य वापर केला जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही भारतीय निवडणूक आयोगाने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करू."

1950 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या पायाभरणीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी 'राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा केला जातो. 2011 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय मतदार दिना'चा उद्देश आहे नवीन मतदारांच्या नावनोंदणीला प्रोत्साहन देणे व सोबतच त्यात आधिकाधिक वाढ करणे. 

Koo मतदार मार्गदर्शक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा :- 

Marathi : तुम्ही प्रथमच मतदान करणार आहात का? – Koo (kooapp.com)

English : Are You a First time Voter? – Koo (kooapp.com)

Hindi : क्या पहली बार मतदाता बने हैं आप? – Koo (kooapp.com)

Punjabi : ਕੀ ਤੁਸੀਂ ਪਹਿਲੀ ਵਾਰ ਵੋਟ ਕਰਨ ਵਾਲੇ ਹੋ ? – Koo (kooapp.com)

 काय आहे कू?

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, 'कू' विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याची सहजसोपी वाट दाखवते. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारत हा असा देश आहे, जिथे 10% पेक्षा जास्त लोक इंग्रजीमध्ये बोलत नाहीत. Koo अॅप भारतीयांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करून त्यांना विचार शेअर करण्यासह आवडीच्या भाषेत मुक्तपणे व्यक्त होण्यास सक्षम बनवते. कू च्या अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, भाषांतर सुविधा. हे वैशिष्ट्य मूळ मजकुरातली भावना आणि संदर्भ जसेच्या तसे राखत युजर्सना त्यांचा संदेश विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून पाठवण्याची रिअल टाइम सुविधा देते. यातून युजर्सची पोहोच वाढत ते 'कू'वर अधिक वेगाने इतरांपर्यंत पोचू शकतात. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget