Kolhapur municipal corporation elections 2022 : ओबीसी आरक्षण लागू झाल्याने कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत होणार
Kolhapur : कोल्हापूर मनपा निवडणुकीमध्ये 25 जागांवर ओबीसी आरक्षण असणार आहे. यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण आता रद्दबातल होणार आहे. प्रशासनाकडून आता नव्याने या संदर्भात आरक्षण सोडत काढली जाईल.
Kolhapur municipal corporation elections 2022 : सर्वोच्च न्यायालयामध्ये आज ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थातच, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने कोल्हापूर महानगरपालिका जाहीर झालेल्या आरक्षणावरही झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर मनपा निवडणुकीमध्ये 25 जागांवर ओबीसी आरक्षण असणार आहे. यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण आता रद्दबातल होणार आहे. प्रशासनाकडून आता नव्याने या संदर्भात आरक्षण सोडत काढली जाईल.
मनपा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 54 जागा असतील. 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर अनुसूचित जमाती प्रवासासाठी एक जागा असेल. राज्यात ओबीसींना 27 टक्के राजकीय आरक्षण आहे. काही स्थानिक स्वराज संस्थांमध्ये एकूण आरक्षणाच्या 50 टक्क्यांवर वर जात असल्याने यासंदर्भात न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण गेल्यावर्षी मार्च 2021 मध्ये रद्द केल्याने जिल्हा परिषद तसेच महानगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांच्या आत ठेवण्याचा आदेश ऑक्टोबर 2021 मध्ये काढला होता.
ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पेरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्याचबरोबर ट्रीपल टेस्टची पूर्तताही करण्यात आली. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी ठाकरे सरकारकडून न्यायालयीन लढाई लढली जात होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून खोळंबल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतरच व्हाव्यात, अशी भूमिका ठाकरे सरकारने घेतली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Sanjay Mandlik : बंटी पाटलांच्या ताकदीने विजयी गुलाल उधळला अन् आता शिंदे गटात, जाणून घ्या खासदार संजय मंडलिकांची राजकीय कारकिर्द
- Sanjay Pawar : कोल्हापूरच्या दोन्ही शिवसेना खासदारांची बंडखोरी, जिल्हाप्रमुख संजय पवार यांना अश्रू अनावर
- Dhairyashil Mane : जिथं सत्ता तिथं राजकीय निष्ठा! खासदार धैर्यशील मानेंच्या राजकीय प्रवासाचा थाटच न्यारा