एक्स्प्लोर

Raju Shetti : अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार; राजू शेट्टींचा इशारा

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनकडून सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे बंगळूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर : राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना पाणी मीटर बसवले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. 

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनकडून सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे बंगळूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देत सरकारने याबाबत 6 जून रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन 6 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.  

राजू शेट्टी म्हणाले की, एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत. दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दहापट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफआरपीमध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे. 

कोल्हापूरकर आंदोलनात कमी पडणार नाहीत

दरम्यान, आमदार सतेज पाटील म्हणाले की, अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी जादा दराने पाणीपट्टी आकारून वसुली करणाऱ्या नफेखोर सरकारने आंदोलकांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत. अन्यथा 6 जून नंतर कोल्हापूरकर आंदोलनात कमी पडणार नाहीत.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार अरूण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील याप्रसंगी उपस्थित होते.  या आंदोलनात डॉ. भारत पाटणकर, विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, जे.पी. लाड, आर.जी. तांबे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील शेतकरी, सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahadev Gitte : महादेव गित्तेला हर्सूल जेलमध्ये पाठवलं, म्हणाला, वाल्मिकनेच आम्हाला मारलंABP Majha Headlines 5 PM Top Headlines 5 PM 31 March 2025 संध्याकाळी 5 च्या हेडलाईन्सMaharashtra News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 31 March 2025 : ABP MajhaSantosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Shinde : पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; अजितदादांचं पुन्हा एकदा नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
पुढच्या वेळेस मी सोडणार नाही, पराभव जिव्हारी; पुन्हा एकदा अजितदादांचं नाव घेत राम शिंदेंचं मोठं वक्तव्य
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
वाल्मिक कराडला मारहाण नाही, पण...; तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र, सांगितलं काय घडलं?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महिलेची नमाज, खांबाला अलिंगन; व्हिडिओ व्हायरल, दोन पोलिसांचे निलंबन
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Embed widget