एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने मतदान; अतिसंवेदनशील पट्टणकोडोलीत पोलिस अधीक्षकांची भेट 

Kolhapur District Gram Panchayat Election) हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. तालुक्यातील पट्टणकोडोली, रेंदाळ आणि इंगळी या ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींपैकी (Kolhapur District Gram Panchayat Election) हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. तालुक्यातील पट्टणकोडोली, रेंदाळ आणि इंगळी या ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. पट्टणकोडोली हे अतिसंवेदनशील गाव असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश वैजने, अप्पर पोलिस अधीक्षक निखेश खाटमोडे, हुपरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी पट्टणकोडोली मतदान केंद्रांवर भेट देत पाहणी केली.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. 

मतदान केंद्रांवर 144 कलम लागू 

कोल्हापूर जिल्ह्यात 430 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे,  प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध आहे. सध्या निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी 137 गावे संवेदनशील आहेत. या गावांवर पोलिस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Gram Panchayat Election) 60 गावांमधील सरपंच व विविध गावांमधील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. दुसरीकडे सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल. जिल्ह्यात निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. यासाठी 10 हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवारी होणार आहे.

निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलिस सज्ज 

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कोल्हापूर पोलिस सज्ज आहेत. सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शीघ्र कृती दल आणि राज्य राखील पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 4 हजार पोलिस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातील 10 अधिकारी,100 कर्मचारी मदतीला घेण्यात आले आहेत.  करवीर, शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे या चार गावांमध्ये कारभारी ठरवण्यासाठी सर्वाधिक चुरस आहे. विधानसभेची गणिते या निवडणुकीतून निश्चित होतील. (Kolhapur District Gram Panchayat Election)

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget