एक्स्प्लोर

Almatti Dam Height : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु केल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलमट्टी उंची वाढवण्याबाबत सुतोवाच केले होते.

Almatti Dam Height : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटककडून हालचाली सुरु केल्याने कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका वाढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दोन महिन्यांपूर्वी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुतोवाच केले होते. आता प्रत्यक्ष तांत्रिक सल्लागाराची निविदा प्रसिद्ध झाल्याने महाराष्ट्राची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे पहावे लागेल.

महाराष्ट्रातील कोयना, पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णेद्वारे अलमट्टीलाच मिळते. अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर या सर्व नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. या अगोदरही कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची (Almatti Dam Height)वाढविण्याचे जाहीर केले होते, मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरूनआंदोलन केले. आताही काही संघटना या विरोधात आहेत.

कर्नाटककडून कृष्णा नदीवरील कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलमट्टी धरणावर 26 अतिरिक्त दरवाजे बसवले जाणार आहेत. हे दरवाजे बसवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही राज्यातील सरकार आपण धामणे सामने येण्याची शक्यता आहे. 

अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतके वाढवण्यासाठी कर्नाटकला कृष्णा पाणी वाटप लवाद-2 कडून परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या मुकुंद घारे समितीने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा उल्लेख केला आहे. या धरणात ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापूर स्थिती भीषण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

एकसंध होऊन लढा उभा करण्याची गरज

अलमट्टी धरणाची उंची 519 वरुन 524 फुटांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याने शिरोळ तालुक्यातील पुरबाधितगावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या उंची वाढवण्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. धरणाची उंची वाढण्यासाठी कर्नाटक सरकारने लवादाकडून तसेच न्यायालयाकडून तशी मान्यताही घेतल्याचे समजते. उंचीच्या वाढीसाठी वेळोवेळी विरोधही झाला मात्र,याचा विचार शासकीय पातळीवर झाला नसल्याने आता यासाठी जनलढा उभारण्याची गरज आहे. शासनानेही याचा विचार करुन अलमट्टीची उंची वाढल्यास महापुरच्या बॅकवॉटरचा धोका निर्माण होवू शकतो, हे लवादाकडे मांडणे सध्या गरजेचे आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन कृष्णा नदीकाठावरील गावांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गावे, शेती पर्यायाने सारे जीवनच उद्धस्त होण्याची भीती आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गावे कायमची संकटात सापडणार आहेत. 2005, 2019, 2021 या सालात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी आलेल्या महाप्रलंयकारी महापुराचे नुकसान पाहता संपूर्ण शिरोळ तालुक्यासह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget