एक्स्प्लोर

Vishalgad: शाहू महाराज विशाळगडावर, मशिदीत पाहणी; हिंसाचाराची धग सोसलेल्या महिलांनी छत्रपतींना पाहताच टाहो फोडला

Kolhapur News: शाहू महाराज विशाळगडावर जात असताना पोलिसांनी पांढरेपाणी येथे त्यांना रोखले. जमावबंदीचे कारण पुढे करत त्यांना विशाळगडावर जाण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत किमान 15 लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली.

कोल्हापूर: विशाळगडाच्या परिसरात रविवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाई आणि त्यापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांनी मंगळवारी विशाळगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी शाहू महाराजांना विशाळगडाच्या (Vishalgad Fort) वादग्रस्त परिसरात जाण्यापासून मज्जाव केला. शाहू महाराजांनी आपल्याला पोलिसांनी अडवल्याचे सांगितले. यानंतर शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरातील तोडफोड झालेल्या मशि‍दीची पाहणी केली. यावेळी स्थानिकांनी आपल्या व्यथा शाहू महाराजांसमोर मांडल्या.

विशाळगड परिसरातील जिल्हा प्रशासनाच्या कारवाईनंतर कोल्हापूरमधील  राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शाहू महाराज यांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती विशाळगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा काहीजणांचा जमाव हिंसक झाला होता आणि त्यांनी विशाळगडाच्या परिसरात तोडफोड केली होती. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची पाहणी केली होती.

शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी ज्या मशिदीती तोडफोड झाली तिथे जाऊन आढावा घेतला. यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शाहू महाराजांना पाहताच मुस्लीम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. रविवारी विशाळगडाच्या परिसरात काय घडलं? कशाप्रकारे तोडफोड करण्यात आली? कोणाचं नाव घेऊन तोडफोड केली जात होती, याची माहिती स्थानिकांनी शाहू महाराजांना दिली. आम्ही उभ्या आयु्ष्यात असा प्रकार कधी पाहिला नव्हता. आम्ही इकडे-तिकडे पळून गेलो म्हणून जीव वाचला, असे स्थानिकांनी सांगितले.

शाहू महाराजांनी विशाळगडाच्या परिसरात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला होता. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवलं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवलं नाही. हा सरकारचा प्लॅन आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवलं हे मला सांगायला लावू नका, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

VIDEO: शाहू महाराज विशाळगडावर

आणखी वाचा

विशाळगड हिंसाचारप्रकरणी MIM आक्रमक, राज्यभरातील कार्यकर्त्यांसह धडकणार कोल्हापूरात, इम्तियाज जलील यांच्या सूचना

Imtiyaz Jaleel on Vishalgad Issue : कुठे छ. शाहू महाराज आणि कुठे जाळपोळीचं नेतृत्व करणारे तुम्ही, इम्तियाज जलील यांचे संभाजीराजेंना खडे सवाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report ST BUS : 75 वर्षांवरच्या नागरिकांच्या तिकीटांत कसा झाला घोटाळा?Special Report Maharashtra Band : हायकोर्टाचे फटकारलं, मविआचा उद्याचा बंद मागे ABP MajhaTOP 9sec Fast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Embed widget