एक्स्प्लोर

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच 

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.

Radhanagari Dam : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असल्याने अगोदरच भरलेल्या धरणांमधून विसर्ग सुरु झाला आहे. गेल्या 24 तासांपासून होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. उघडलेल्या तीन स्वयंचलित दरवाज्यातून 4 हजार 284 क्युसेकने, तर पाॅवर  हाऊसमधून 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. दोन्ही मिळून राधानगरी धरणातून 5 हजार 884 क्युसेकने भोगावती नदीमध्ये विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा 10 वाजून 55 मिनिटांनी उघडला. त्यानंतर आणखी दोन दरवाजे उघडले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे थैमान सुरु आहे. आज सकाळपासून शहर परिसराह जिल्ह्यात पावसाने उसंत घेतलेली नाही. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 

राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे मोसमात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. त्याचबरोर रुई आण इचलकरंजी बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

दुसरीकडे पावसाचा जोर वाढल्याने तुळशी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून तुळशी धरणातून सध्या असणारा 500 क्युसेक्स विसर्ग 300 ने वाढ करून 8000 क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पाटगाव, कुंभी धरण 100 टक्के भरले

पावसाचा जोर वाढल्याने पाटगाव आणि कुंभी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल दुपारी अडीचच्या सुमारास पाटगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर सायंकाळी चारच्या सुमारास कुंभी धरण 100 टक्के भरले. 

जिल्ह्यातील 9 धरणे 100 टक्के भरली

जिल्ह्यातील तुळशी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे आणि कोदे धरण 100 टक्के भरले आहे.  

अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु 

पावसाचा जोर वाढल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरणातून 52 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून विसर्ग सध्या बंद आहे. दुसरीकडे कोयना धरणातूनही विसर्ग बंद आहे. धरणात 2 हजार 469 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. धरणात 100.70 टीएमसी पाणीसाठा आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget