Vishalgad Fort Landslide : विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड रणमंडळ टेकडीवर सुरक्षित ठेवले, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांकडून मोहिम फत्ते
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांनी किल्ले विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षितस्थळी नेले. हर हर महादेवचा जयघोष करत सात तास जिद्दी मावळ्यांनी लढा देत मोहिम फत्ते केली.
![Vishalgad Fort Landslide : विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड रणमंडळ टेकडीवर सुरक्षित ठेवले, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांकडून मोहिम फत्ते The stones of Vishalgarh fort collapsed tower were kept safe on Ranmandal Hill Vishalgad Fort Landslide : विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड रणमंडळ टेकडीवर सुरक्षित ठेवले, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांकडून मोहिम फत्ते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/18/1c7cea16176a6000a215eef48351d3611658128295_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vishalgad Fort Landslide : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे. पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा बुरुज ढासळल्यानंतर तेथील घसरलेले दगड एकत्रित करून रणमंडळ टेकडीवर जमा करण्यात आले आहेत.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांनी काल किल्ले विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षितस्थळी नेले. या सर्व मावळ्यांनी काल रविवारी गड संवर्धन मोहिम राबवत ढासळलेल्या दगडांना सुरक्षितस्थळी नेले. हर हर महादेवचा जयघोष करत तब्बल सात तास जिद्दी मावळ्यांनी लढा देत मोहिम फत्ते केली.
खांद्यावरून एक एक दगड वाहून नेत मोहिम राबवण्यात आली. अनेक जिल्ह्यातील मावळे या मोहिमेसाठी स्वयंस्फूर्तीने गड संवर्धनासाठी दाखल झाले होते. यामध्ये 25 युवतींचाही समावेश होता. सर्व दगड रणमंडळ टेकडीवर ढीग लावून ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, बुरुजाची बांधणी होईपर्यंत मार्ग बंद राहिला आहे.
गडावर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा दगडी बुरुज कोसळला होता. त्यामुळे लोखंडी जिन्यावरील ये जा बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाने लोक गडावर येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडनंतर (panhala fort landslide) विशाळगडावरही बुरुज ढासळल्याने दोन्ही किल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या दोन किल्ल्यांची पडझड मनाला वेदना देत असतानाच मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि शिवरायांनी पुर्नबांधणी करून घेतलेला विजयदुर्गही (Vijaydurg Fort) आता संकटात सापडला आहे. आता या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे यांनी गडाची तटबंदीला फुगवटा आल्याने केंद्र सरकार, राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात 2020 मध्येच पत्रव्यवहार करून डागडूजी करण्यासाठी विनंती केली होती.
इतर महत्त्वाच्या महत्वाच्या
- Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
- Balasaheb Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूरमधील स्वप्नाला अवघ्या अडीच वर्षात सुरुंग!
- Rajesh Kshirsagar : कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)