एक्स्प्लोर

Textile policy: राज्याचे पुढील पाच वर्षांसाठी वस्त्रोद्योग धोरण जाहीर, इचलकरंजीला किती लाभ होणार?

जुन्या धोरणाची मुदत 31 मार्च रोजी संपली होती. त्यामुळे नव्या धोरणाविषयी उत्सुकता होती. नव्या धोरणामध्ये पर्यावरणपूरक शाश्वत उत्पादनासाठी हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भर देण्यात आला आहे. 

Textile policy: राज्य सरकारकडून सन पुढील पाच वर्षांसाठी नवीन वस्त्रोद्योग धोरणाला (Textile industry policy of the maharashtra) मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तसेच 5 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यात टेक्स्टाईल पार्कचा विकास करण्यात येणार आहे. उत्पादित कापसावरील प्रक्रिया क्षमता 30 टक्‍क्‍यांहून 80 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. जुन्या धोरणाची मुदत 31 मार्च रोजी संपली होती. त्यामुळे नव्या धोरणाविषयी उत्सुकता होती. नव्या धोरणामध्ये पर्यावरणपूरक शाश्वत उत्पादनासाठी हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात भर देण्यात आला आहे. 

हरित तंत्रज्ञानाचा अवलंब, वस्त्रोद्योग घटकांना 50 टक्के भांडवल अनुदानासह प्रकल्पांना प्रोत्साहन, इंडियन ट्रीटमेंट प्लांटसाठी 5 कोटी, झिरो लिक्विड डिस्चार्जसाठी 10 कोटी, सोलर प्लांट्स काॅमन स्टीम जनरेशन पाण्यासाठी 1 कोटी,  रिसायकल प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये देण्याची तरतूद, चार मेगावॉट क्षमतेपर्यंतच्या सोलर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी भांडवली अनुदान आदी मुद्यांचाही समावेश आहे.

स्वतंत्र महामंडळ स्थापन होणार  

राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी तसेच पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सध्या विभागासाठी तीन महामंडळ कार्यरत आहेत. या तिन्ही मंडळाची या महामंडळात विलीनीकरण करण्यात येणार आहे.

इचलकरंजी नव्या धोरणाने संभ्रमात 

दरम्यान, नव्या वस्त्रोद्योग धोरणानंतर वस्त्रोद्योग नगरी इचलकरंजीमध्ये (Ichalkaranji) संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगनगरी असलेल्या इचलकरंजीत संभ्रमावस्था आहे. यंत्रमागाबाबत कोणतही स्पष्टता दिसून येत नाही. वीज सवलतीचे धोरण पुढे सुरु राहणार का? याबाबतही भीती कायम आहे. त्यामुळे जीआर आल्यानंतर व्यावसायिकांची भीती कमी होणार आहे. राज्यात सहा टेक्स्टा्ईल पार्कचा विकास करण्यात येणार असले, तरी यामध्ये इचलकरंजीमध्ये टेक्स्टाईल पार्कला लाभ मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. नवीन वस्त्रोद्योग धोरणांवरून लाभांबाबत वस्त्रोद्योग जाणकारही संभ्रमात आहेत. त्यामुळे तज्ज्ञांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यामुळे शासन आदेश आल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 January 2025Thane MNS Protest : खेळाच्या मैदानावर अतिक्रमण,मनसे कार्यकर्ते पालिकेत खेळले फूटबॉल ABP MAJHADevendra Fadnavis : शरद पवार यांचा मला फोन येत असतो, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ABP MAJHALaxman Hake On Suresh Dhas : कराडचे फोटो सुरेश धसांसोबत, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
भाचीच्या रिसेप्शनमधील जेवणात विष कालवणारा मामा फरार, शोध सुरू; पोलिसांनी जेवणाचे सॅम्पल घेतले
Sheikh Hasina : तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
तिकडं बांगलादेशकडून पासपोर्ट रद्द, गुन्ह्यांवर गुन्हे अन् वॉरंटही जारीचा खेळ सुरुच; इकडं भारताचा सुद्धा शेख हसीनांसाठी तगडा निर्णय!
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
वाल्मिक कराड आका, आकाचा आका धनंजय मुंडे; तर सुरेश धसांनी उल्लेख केलेली राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sarangi Mahajan on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी माझी जमीन बळकावली;सारंगी महाजनांचा गंभीर आरोप
Sunil Tatkare : शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
शरद पवारांचे 7 खासदार फोडताय का? सुनील तटकरे म्हणाले, दिल्लीत खासदारांची भेट पण...
Commenting on Women Figures : महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
महिलांच्या फिगरवर कमेंट करणे गुन्हाच! मेसेजमध्ये सतत सेक्शुअल कमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाचा झटका
Embed widget