Kolhapur Crime : मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट ; एकुलत्या एक मुलीच्या कृत्याने हळहळ
Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव असून या घटनेची कोडोली पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दुसऱ्या मजल्यावर श्रद्धाला जेवण्यासाठी हाक मारण्यासाठी घरातील सदस्य वर गेला असता श्रद्धाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
सव्वा वर्षाच्या बाळाला स्तनपान करून होमगार्डच्या पत्नीने जीवनयात्रा संपवली
दरम्यान, पोटच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या लेकराला स्तनपान केल्यानंतर त्याला झोपवून विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) शहरातील यादवनगर परिसरात शनिवारी घटना घडली. निकिता ओंकार येडगे (वय 25 ) असे या विवाहितेचे नाव असून तिचा पती होमगार्ड आहे. अवघ्या सव्वा वर्षाच्या मुलाला स्तनपान करून झोपवल्यानंतर निकीताने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, निकीताच्या माहेरकडील लोकांनी छळातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिल्यानंतर पती ओंकार, सासरे दिलीप बाळू येडगे, दीर विनय आणि सासू अर्चना यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यादवनगरमध्ये निकिताने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचे माहेर वेसरफ (ता.गगनवाबडा) येथील आहेत. निकिताचा विवाह ओंकार येडगे यांच्याशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. ओंकार होमगार्ड असून खासगी नोकरीही करत आहे. सकाळी घरातील सर्व लोक बाहेर गेल्यानंतर निकिताने बाळाला स्तनपान करून झोपवल्यानंतर छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आजी घरी आल्यावर त्यांनी पाहिले असता निकिताने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने बेशुद्ध निकिताला तत्काळ सीपीआरमध्ये नेले. मात्र. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























