एक्स्प्लोर

राज्यपालांना वेळीच आवर घालून हकालपट्टी करा; आठ दिवसात कारवाई न केल्यास एकही कार्यक्रम होऊ देणार नाही! संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'कडून एल्गार

दैवत असलेल्या महापुरुषांच्या अपमान करण्याची माळच लावलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संभाजीराजे छत्रपती यांच्या (Sambhajiraje Chatrapati) स्वराज्य संघटनेकडून एल्गार करण्यात आला आहे.

Sambhajiraje Chatrapati swarajya : राज्यासाठी दैवत असलेल्या महापुरुषांच्या अपमान करण्याची माळच लावलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात संभाजीराजे छत्रपती यांच्या (Sambhajiraje Chatrapati swarajya) स्वराज्य संघटनेकडून एल्गार करण्यात आला आहे. राज्यपालांना वेळीच आवर घालून हकालपट्टी करा, अन्यथा महाराष्ट्रात एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा कडक इशारा स्वराज्य संघटनेने दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तातडीने दिल्लीला बोलवून घ्या, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोल्हापुरातील स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आठ दिवसांची मुदत दिली आठ दिवसात कारवाई न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर याचा उद्रेक पाहायला मिळेल आणि याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशारा स्वराज्य संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

स्वराज्यने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदावर नियुक्त झाल्यापासून महाराष्ट्र, महापुरुष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता याबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यांनी शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करून राज्याच्या उज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. त्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही हीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे. कोश्यारी यांना वेळीच आवर घालून त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा राज्यातील जनतेचा उद्रेक होऊ शकतो. निवेदनाची दखल घेऊन राज्यपालांना हटवावे, अन्यथा जनआंदोलनातून जे काही परिणाम होतील, त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल. 

राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत?

Sambhajirraje on Governor : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती  (Sambhaji Raje Chhatrapati) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. संभाजीराजे यांनी कडक शब्दात ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचं समर्थन करतंय का असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!' या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget