(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kolhapur municipal corporation : कोल्हापूर शहरातील खुल्या जागा व इमारतींना मालमत्ता कर आकारणीसाठी विशेष शिबीर
ज्या मिळकतींवर खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी विशेष शिबिराचे कोल्हापूर मनपाकडून आयोजन करण्यात आले आहे.
kolhapur municipal corporation : कोल्हापूर शहरातील ज्या मिळकतींवर खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी विशेष शिबिराचे कोल्हापूर महानगरपालिकेकडून आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर 17 ते 20 ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान (घरफाळा ऑफिस), मंगळवारी विभागीय कार्यालय क्रं.2 छ.शिवाजी मार्केट (घरफाळा ऑफिस), बुधवारी विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी (घरफाळा ऑफिस), गुरुवारी विभागीय कार्यालय क्रं.4 ताराराणी मार्केट (घरफाळा ऑफिस) येथे चारही दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत शिबीर होईल.
यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियममधील कराधान नियम 8 कलम 5 (1) नुसार कर आकारणी करुन दिली जाणार आहे. यासाठी प्रॉपर्टी कार्ड/सातबारा उतारा/इंडेक्स उतारा/सेल डिड/ कब्जेपट्टी/ झोपडपट्टी कार्ड, बांधकाम परवानगी/प्रारंभ प्रमाणपत्र/भोगवटा प्रमाणपत्र/प्रथम लाईट बिल, अपार्टमेंट असलेस बिल्डर/डेव्लपर यांचे पूर्ण नांव व पत्ता याबाबतची कागदपत्रे आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या मिळकतींना यापूर्वी कराचे देयक येत होते. परंतु, आता येत नाही अशा मिळकतधारकांनी देयकाची छायांकीत प्रत व कर भरणा केलेल्या पावतीची छायांकीत प्रत आणावी.संबंधित मिळकतधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रासह महापालिकेने ठरवून दिलेल्या दिवशी विभागीय कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत 4 लाख 75 हजार वसूल
दरम्यान, शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील थकबाकीदारांकडून 4 लाख 75 हजार 842 थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या 10 थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.
राजारामपुरी, शाहुनगर, दौलतनगर या भागात 2 लाख 11 हजार 087, गणेश नगर, शिगणापुर रोड मिराबाग परिसरात 78 हजार 878, लक्ष्मीपुरी, सिध्दार्थ नगर या भागात 1 लाख 12 हजार 549 इतकी फिरती करून वसुली करण्यात आली. विक्रमनगर नवदुर्गा गल्ली येथे 73 हजार 328 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या