Chandrakant Patil : संजय मंडलिकांच्या पराभवानंतर कोल्हापुरात महायुतीकडून आत्मचिंतन; चंद्रकांतदादा होम ग्राऊंडवर पुन्हा सक्रिय
गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. त्यामुळे ते कोल्हापूरच्या राजकारणापासून चंद्रकांतदादा पाटील स्थानिक राजकारणापासून दूर असल्याचे चित्र होतं.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे मतदार संजय मंडलिक यांना काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून पराभवाचा दणका बसल्यानंतर आता महायुतीमध्ये आत्मचिंतन सुरू झालं आहे. संजय मंडलिक यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला. या बैठकीसाठी भाजप नेते मकरंद देशपांडे, खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. या बैठकीचे निमित्ताने मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
पाटील यांनी बैठक घेत पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये लक्ष घातलं
गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. ते कोथरूडमधून आमदार आहेत. त्यामुळे घरचं मैदान असून सुद्धा कोल्हापूरच्या राजकारणापासून चंद्रकांतदादा पाटील स्थानिक राजकारणापासून दूर असल्याचे चित्र होतं. मात्र आता महायुतीचे संजय मंडलिक यांच्या पराभवानंतर पाटील यांनी बैठक घेत पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये लक्ष घातलं आहे.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक यांचा कागल हा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधूनही शाहू महाराजांना मताधिक्य मिळाले. करवीरने सुद्धा भरघोस मते शाहू महाराजांना दिल्याने विजय सुकर झाला. इतकेच नव्हे तर कागलमधून घाटगे आणि मुश्रीफ समर्थकांनी एकमेकांवर मताधिक न मिळाल्याने आरोपांच्या पायरी सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या