(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉटरिचेबल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sambhaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) गेल्या पाच दिवसांपासून नॉटरिचेबल असल्याचं समोर आलं आहे. संभाजीराजे नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. 3 जानेवारी पासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरे अचानक रद्द केले आहेत.
संभाजीराजे छत्रपती गेल्या पाच दिवसांपासून नॉटरिचेबल
दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर जिल्ह्यातून लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे. संभाजीराजे यांचे रविवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात दौरे सुरु होणार होते. पण, दौऱ्यांना अनुपस्थित राहत संभाजीराजे छत्रपती नॉटरिचेबल झाल्याची माहिती आहे. संभाजीराजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते पण ते गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा होण्याची शक्यता
संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे. 11 फेब्रुवारीला वाढदिवसाच्या कार्यक्रमात संभाजीराजे यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वाढदिवसानंतर संभाजीराजे छत्रपती यांचे मतदारसंघात दौरे सुरू होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कोणत्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार?
संभाजीराजे कोणत्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी संभाजीराजे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चा
लोकसभेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना आता संभाव्य उमेदवारांच्या नावांच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. कोल्हापुरातूनही राजघराण्यातील श्रीमंत शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाच्या जोरदार चर्चा आहेत. देशातील अनेक राजघराणी भाजपसोबत जाता असताना कोल्हापूरच्या राजघरण्याला आपल्या सोबत घेण्याची तयारी इंडिया आघाडीने सुरू केली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजघराण्यातच उमेदवारी देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :