एक्स्प्लोर

Nagpur News : आजी-माजी गृहमंत्री एकाच मंचावर, फडणवीसांसमोर देशमुख काका-पुतण्या भिडले, अनिल देशमुखांनी भाषण अर्धवट सोडलं!

Katol BJP-NCP Clash : राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झाला. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून राहुल देशमुख यांचं भाषण थांबवावं लागलं.

Nagpur DCM Devendra Fadnavis News : नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काटोल (Katol) इथल्या कार्यक्रमात गोंधळ झाला. काटोल नगरपरिषदच्या (Katol Municipal Council) विकास कामाचे भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा सर्वपक्षीय कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सुद्धा उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते राहुल देशमुख (Rahul Deshmukh) यांच्या भाषणाला भाजपने (BJP) आक्षेप घेतल्याने अनिल देशमुख आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.

फडणवीस-देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा राडा

राष्ट्रवादीचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणानंतर गोंधळ झाला. यावेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून राहुल देशमुख यांचे भाषण थांबवावं लागलं. राहुल देशमुख यांचा रोष होता. या राड्यानंतर अनिल देशमुख हे भाषणाला उभे राहिले. मात्र, गदारोळानंतर अनिल देशमुख यांनी भाषण अर्धवट सोडलं. देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं या कार्यक्रमात पाहायला मिळालं.

आजी-माजी गृहमंत्री एकाच मंचावर

शासकीय निधी वाटपासाठी भाजप मेळावा घेत असल्याच्या आरोपानंतर अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज एका व्यासपीठावर आले. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी काटोल नगर परिषदेच्या शासकीय कार्यक्रमात अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर आमदार म्हणून उपस्थित राहिले.  

देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही सुनावलं

यावेळी अनिल देशमुख यांच्या रोषाचा सामना नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सहन करावा लागला. भाषणात उपस्थितांचे जिल्हाधिकारी साहेब म्हणून मी तुमचा उल्लेख करतो असं त्यांनी सांगितलं. हा भाजपचा कार्यक्रम नसून शासकीय कार्यक्रम आहे. सर्वपक्षीय नेते उपस्थित असल्याचंही त्यांनी सांगितलं. पट्टे वाटप करताना मला कसं थांबवलं, हेही देशमुखांनी आपल्या भाषणात सांगितलं. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.  

कार्यक्रमाआधी अनिल देशमुखांचा आरोप 

भाजपच्या मेळाव्यासाठी शासकीय निधीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात पारडसिंगा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महिला मेळाव्यासाठी महिला बचत गटाच्या महिला, तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी प्रत्येक गावातून 100 महिला आणाव्या असं पत्रच काटोलच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पाठवलं आहे. तसेच या 100 महिलांच्या नेआण करण्यासाठी लागणारा आवश्यक खर्च व वाहन खर्च ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून देण्यात यावं असा आदेशही गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींना दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. भाजपने राजकीय मेळावा घ्यावा, मात्र तो शासनाच्या निधीतून घेऊ नये असा टोलाही अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र
ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thakceray : विलास भुमरे यांचं वक्तव्य, राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray : मतदारयादीत ९६ लाख बोगस मतदार? राज ठाकरेंचा गंभीर आरोप
MVA-MNS Action : निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांची एकजूट, रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Defender Car Row: दीड कोटींच्या गाडीवरून वाद, मालकानेच केला मोठा खुलासा
Diwali Rush: 'प्रशासनाविरोधात नाराजी', Mumbai-Goa Highway वर हजारो वाहने अडकली, कोकणचा प्रवास महागला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बिबट्या आला रे आला; वन विभागाने सुरू केली एआय तंत्रप्रणाली, ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य
बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र
ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र
नर्स अन् MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध, 'कायमचं एकत्र' राहण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं
नर्स अन् MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध, 'कायमचं एकत्र' राहण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं
मनसेची बूथ लेव्हल एजंटची 15 ते 20 हजारांची फौज तयार; अविनाश जाधवांनी ठाण्यात बोगस मतदार शोधून त्यांचं काय करणार ते सुद्धा सांगितलं!
मनसेची बूथ लेव्हल एजंटची 15 ते 20 हजारांची फौज तयार; अविनाश जाधवांनी ठाण्यात बोगस मतदार शोधून त्यांचं काय करणार ते सुद्धा सांगितलं!
कोरोना काळात रुग्णाच्या मनाविरुद्ध उपचार, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट; नगरच्या 5 नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल
कोरोना काळात रुग्णाच्या मनाविरुद्ध उपचार, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट; नगरच्या 5 नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल
Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Embed widget