एक्स्प्लोर

Raju Sheti : ...तर तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल

जेव्हा शेतीमालाचे भाव वाढतात, शेतकऱ्यांना चार पैसे मिळवण्याची वेळ येते जेव्हा तेव्हा केंद्र सरकार अशा प्रकारचे कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

कोल्हापूर : कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर 40 टक्के कर लावत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निर्यातीवर कर लावण्यात आल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर घणाघाती प्रहार केला आहे. निर्यातीवर कर लावून कांदा उत्पादक नव्हे, तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची सडकून टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

केंद्र सरकार कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते

राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारचे धोरण नवीन नाही. जेव्हा जेव्हा भाव वाढतात, शेतकऱ्यांना चार पैसे मिळवण्याची वेळ येते जेव्हा तेव्हा केंद्र सरकार अशा प्रकारचे कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते. जेव्हा भाव पडतात, तेव्हा मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात. भाजीपाल्याचे भाव पडले, फ्लाॅवर, कोबी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला. सरकारची प्रतिक्रिया काहीच नाही. टोमॅटोचे भाव पडले, रस्त्यावर लाल चिखल झाला त्यांची प्रतिक्रिया काहीच नाही. टोमॅटोचे भाव पाडल्यानंतर नाफेडने खरेदी केला. 

तर शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही

जून महिन्यांमध्ये अतिवृष्टीने कांद्याचे नुकसान झाले. चाळीतला कांदा सडला. सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली. आता चार पैसे मिळतात म्हटल्यानंतर येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना खूष करण्यासाठी म्हणून जर का हा निर्णय घेत असेल तर केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हे ध्यानात ठेवावं की या देशांमध्ये जवळपास 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तुम्ही भले त्यांना वेगवेगल्या पिकात विभागले असाल पण आता सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे. एक संकटात सापडला आणि दुसरा मदतीला नाही गेला तर सगळ्यांचीच माती होणार आहे. तेव्हा देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे, मुठभर ग्राहकांसाठी एकेकाला खिंडीत पकडत असाल तर देशभरातील सगळे शेतकरी एकत्र येऊन तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. 

दुसरीकडे, केंद्राने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून तब्बल 40 टक्क्यांवर नेल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समिती बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमित मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Embed widget