एक्स्प्लोर

Rajaram Sakhar Karkhana : बंटी पाटील विरुद्ध महाडिक संघर्ष आज थेट बिंदू चौकात; साडे सात वाजताची वेळ, कोल्हापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

Satej Patil vs Mahadik : गुरुवारी सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान केल्यानंतर आज अमल महाडिक यांनी बिंदू चौकात चर्चेला येण्याची तयारी केली आहे.

Kolhapur Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय गट असलेले महाडिक आणि सतेज पाटील गट आमनेसामने आले आहेत. मुद्यावर आणि शेतीसमोर असलेल्या आव्हानांवर टिकाटिप्पणी होण्याऐवजी ही लढाई आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचली आहे. विशेष करून अमल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही आज सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याने प्रचार संपेपर्यंत आणखी यामध्ये भर पडत जाणार आहे यात शंका नाही. 

काल सतेज पाटील यांनी बिंदू चौकात येऊन चर्चा करण्याचे आव्हान केल्यानंतर आज अमल महाडिक यांनी बिंदू चौकात चर्चेला येण्याची तयारी केली आहे. अगदी थोड्या वेळात म्हणजे साडेसात वाजता सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील हे बिंदू चौकामध्ये येणार आहेत. दुसरीकडे, महाडिक कुटुंबीयांकडून अमल महाडिक हे बिंदू चौकामध्ये चर्चेसाठी येणार आहेत. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्ष बिंदू चौकात चर्चेसाठी या असे म्हणत होते. मात्र, आता प्रत्यक्षात सतेज पाटील गट आणि महाडिक गट बिंदू चौकात उपस्थित राहणार आहे.

सतेज पाटील काय म्हणाले होते?

सतेज पाटील म्हणाले होते की, मी 100 टक्के म्हणतो या व्यासपीठावर नव्हे, तर बिंदू चौकात सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, 100 टक्के भ्यालेत. भ्याले नसतील, तर छाननीमध्ये अर्ज उडवण्याचे कारण काय? अमल महाडिक म्हणाले, महाडिक भ्याले नाहीत. महाडिक घरी गेल्यानंतर बंटी पाटील घरातून बाहेर पडले नाहीत. बाळ तू लहान आहेस. मी घरातून बाहेर न पडणारा पाटील नाही. मी त्यादिवशी पुण्यात होतो. मी जर असतो, तर काय झालं असतं हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलं असतं. 

सतेज पाटलांच्या आव्हानावर अमल महाडिक काय म्हणाले?

अमल महाडिक आज (14 एप्रिल) प्रचार शुभारंभात म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही आणि बावड्यात येऊन फिरणारच. सतेज पाटील लिमिटमध्ये रहा आणि लिमिटबद्दल बोला. आम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांवर बोलत नाही. मात्र, तुम्ही महादेवराव महाडिक यांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ. बिंदू चौकात 7 वाजता येतो, तुम्ही देखील या. तुमच्या सोबत बोलणारे लोक तुमचे घात करणार आहेत. निवडणूक लागली की, तुम्ही सभासदांच्या घरी जात असता, आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. आमच्या सभासदांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget