Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला; अमल महाडिकांसह 'या' नावांचीसुद्धा चर्चा
राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक प्रबळ दावेदार असले, तरी महादेवराव महाडिकांचे आजवरचे धक्कातंत्र पाहता म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा आहे.
![Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला; अमल महाडिकांसह 'या' नावांचीसुद्धा चर्चा Rajaram Sakhar Karkhana Chairman election on 9th may including amal mahadik discussion on 3 names kolhapur maharashtra news Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला; अमल महाडिकांसह 'या' नावांचीसुद्धा चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/03/671a09494d108e82fde692731123ecbf1683095508034444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajaram Sakhar Karkhana: नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक 9 मे रोजी होत आहे. निवडणूक पार पडल्यानंतर संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कारखान्याची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक प्रबळ दावेदार असले, तरी महादेवराव महाडिकांचे आजवरचे धक्कातंत्र पाहता म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा आहे. नव्या संचालक मंडळामध्ये 14 नवीन चेहरे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी दिलीप पाटील तसेच शिवाजी पाटीलही नावे चर्चेत येऊ शकतात. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 9 मे रोजी सकाळी दहा वाजता करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक होईल. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार? यावर शिक्कामोर्तब केलं जाईल.
कारखान्यावर महाडिकांची एकहाती सत्ता
दरम्यान, कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि अत्यंत टोकदार अशा झालेल्या प्रचाराने अवघ्या कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम कारखान्याच्या लढतीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली होती. सत्ता अबाधित राखताना महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी मिळवला. गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची कारखान्यावर सत्ता आहे. निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या टॅगलाईनने स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. महाडिकांची कधी नव्हे ती या निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट परफेक्ट दिसून आली. 29 उमेदवारांना पोटनियमांतील तरतुरदीमधून अवैध ठरवल्याने हा झटका सतेज पाटलांना ऐन निवडणुकीत जिव्हारी लागणारा होता. त्यामुळे सतेज पाटील गटाचे तगडे उमेदवार रिंगणातून बाहेर गेले आणि त्याचा फटकाही बसला.
दुसरीकडे, अमल महाडिकांनी (Amal Mahadik) संयमाने प्रचार करतानाच धनंजय महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आक्रमक प्रचार केला. 'महाडिक भ्यालेत' या टीकेवरुन त्यांनी त्यांनीही चोख प्रत्युत्तर सभांमधून दिले. सतेज पाटलांकडून सातत्याने ऊसाच्या कमी दराचा उल्लेख झाला, पण तो सभासदांना भावला नसल्याचे दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)