Rajaram Sakhar Karkhana : सभा सुरु होण्यापूर्वीच मंजूरचे फलक, दोन्ही गटाची घोषणाबाजी, ठरावांची सुद्धा होळी; 'राजाराम' कारखान्याच्या वार्षिक सभेत काय काय घडलं?
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनंतर नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत समांतर सभा घेत ठरावांची होळी केली. त्यामुळे सभा सुद्धा वादळी ठरली
कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह (Kolhapur News) पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana) वार्षिक सर्वसाधारण आज पार पडली. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेनंतर नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग करत समांतर सभा घेत ठरावांची होळी केली. त्यामुळे कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुद्धा वादळी ठरली. आज पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवणे हा प्रमुख मुद्दा होता. 44 गावे नव्याने कारखाना कार्यक्षेत्रात वाढविण्यास विरोधी गटाकडून विरोध सुरु आहे. राजाराम कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिकांनी त्यंना पाच महिन्यांपूर्वी उत्तर सभासदाने दिल्याचा टोला लगावला.
घोषणाबाजीमध्ये सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली
वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी सभासदांकडून गटांकडून मंजूर मंजूर असे फलक झळकावले. त्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर विरोधी गटाचे सभासद व सभासद येईपर्यंत कारखान्याच्या सभा ठिकाण पूर्ण भरुन गेले होते. त्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडून विषयांचे वाचन सुरू झाल्यानंतर विरोधी गटाकडून घोषणाबाजी सुरू करण्यात आली. या घोषणाबाजीमध्ये सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
कारखान्याचे अध्यक्ष अमोल महाडिक यांनी सभा खेळीमेळीत पार पडल्याचा दावा केला. ते म्हणाले की, विरोधकांकडून विनाकारण वाद घालण्यात येत आहेत. त्यांना माझं सांगण इतकंच आहे की बिगर सभासद ऊस घालतो. त्यामुळे बिगर सभासदांची वाढती मागणी लक्षात घेता कारखाना कार्यक्षेत्रात विस्तार करण्याचा निर्णय घेतला. या सभेमध्ये मोजकेच 25 लोक गोंधळ घालतात. मात्र, पाच ते सात हजार सभासदांनी आमच्या भूमिकेला मंजुरी दिली आहे. शेतकरी आमच्या कारखान्याला ऊस घालत असल्याने या सर्वांचा विचार करून कारखाना कार्यक्षेत्र वाढून तो मल्टीस्टेट करण्याचा निर्णय घेतल्याचे कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक म्हणाले.
दुसरीकडे, सत्ताधारी महाडिक गटाला याच महिन्यात मोठा धक्का बसला असून राजाराम कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या