एक्स्प्लोर

Kolhapur : महाडिक गटाला मोठा धक्का, राजाराम कारखान्यातील शौमिका महाडिकांसह 1272 सभासद अपात्र 

Rajaram Sakhar Karkhana : साखर आयुक्तांनी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या बाजूने निर्णय देत महाडिक गटातील 1272 सभासदांना अपात्र ठरवले आहे. 

कोल्हापूर: महाडिक गटाला मोठा धक्का बसला असून राजाराम सहकारी साखर कारखान्यातील (Kolhapur Rajaram Sakhar Karkhana) 1272 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबीयांतील 10 जणांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. 

कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीच बोगस सभासदांचा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करावी, या सभासदांची नावं कमी करावी अशी मागणी करत सतेज पाटलांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यानंतरही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महाडिक गटाने बाजी मारत सत्ता कायम ठेवली. 

साखर आयुक्तांनी आता सतेज पाटील यांच्या तक्रारीवर निर्णय घेत या कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरवले आहेत. त्यामध्ये महाडिक कुटुंबातील 10 सभासदांचा समावेश आहे. यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे. 

सतेज पाटील गटाची प्रतिक्रिया 

सारख आयुक्तांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सतेज पाटील गटाकडून एक निवेदन काढण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की, मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून आमच्या आघाडीच्या इच्छूक उमेदवारांपैकी 30 उमेदवारांचे अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवून आमचे 30 तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालविले. तरीसुद्धा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण 12,336 इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11,000 सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिद्ध झाले आहे. या अपात्र सभासदांच्यामुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. 

कारखान्यावर महाडिकांची एकहाती सत्ता

कोल्हापुरातील राजाराम कारखान्याची निवडणूक ही राज्यभर गाजली होती. या निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि महाडिक गट यांच्या राजकारणाची पार्श्वभूमी होती. कारखान्याची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि अत्यंत टोकदार शब्दात एकमेकांवर वार करण्यात आले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली होती. सत्ता अबाधित राखताना महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर विजयी मिळवला. 

गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची कारखान्यावर सत्ता आहे. निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या टॅगलाईनने स्लोगनने प्रचारामध्ये उतरलेल्या आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या विरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. महाडिकांची कधी नव्हे ती या निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट परफेक्ट दिसून आली. 29 उमेदवारांना पोटनियमांतील तरतुरदीमधून अवैध ठरवल्याने हा झटका सतेज पाटलांना ऐन निवडणुकीत जिव्हारी लागणारा होता. त्यामुळे सतेज पाटील गटाचे तगडे उमेदवार रिंगणातून बाहेर गेले आणि त्याचा फटकाही बसला. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Case | परभणी हिंसाचारावरून मुख्यमंत्री फडणवीसांंचं विधानसभेत निवेदन ABP MajhaMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टKalyan Society Rada कल्याण | मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यातMumbai : मुंबईत एका कंपनीत  बिहारी मॅनेजरकडून मराठी कर्मचाऱ्याला त्रास ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
Embed widget