Ajit Pawar In Kolhapur : विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर
Ajit Pawar In Kolhapur : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पन्हाळा तालुक्याती आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.

Ajit Pawar In Kolhapur : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पन्हाळा तालुक्याती आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित असतील.
अजित पवार यांचे दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. त्यानंतर ते दुपारी तीनला आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी रवाना होतील. कोतोली फाटा (ता. पन्हाळा) येथे आगमन झाल्यानंतर मोटारसायकल रॅलीने कोतोली ते आसुर्लेपर्यंत जातील. सायंकाळी पाच वाजता आसुर्ले येथे ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व त्यानंतर कार्यकर्ता मेळावा होईल.
इतर महत्वाच्या बातम्या























