Kolhapur News: 'महादेवी' हत्तीणीसाठी नांदणीकर मध्यरात्री रस्त्यावर; हजारो नागरिक एकवटले, आज मूक मोर्चा
Mahadevi Elephant: गेल्या बाराशे वर्षाची परंपरा या महादेवी मठाला आहे. त्यामुळे या नांदणी मठाचा हत्ती का हवा आहे? असा सवाल समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.

Mahadevi Elephant: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठाच्या महादेवी हत्तीणीला नेण्यासाठी गुजरात येथील वनताराचे पथक येणार असल्याचा समज झाल्यानंतर मध्यरात्री हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि या निर्णयाला विरोध केला. कोणत्याही स्थितीमध्ये महादेवी हत्तीणीला गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका नांदणीकरांनी घेतली. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मठाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज निर्णय होणार असल्याने समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे कोणता निर्णय येतो याकडे लक्ष असेल.
निर्णयाविरोधात आज मूक मोर्चाचे आयोजन
दुसरीकडे, या निर्णयाविरोधात आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या बाराशे वर्षाची परंपरा या महादेवी मठाला आहे. त्यामुळे या नांदणी मठाचा हत्ती का हवा आहे? असा सवाल समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्याकडे हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांचा गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं होतं. या पार्श्वभूमीवर हत्तीला नेण्यासाठी पथक येणार असल्याचे समजताच हजारो नागरिक जमा झाले. आम्ही कोणत्याही स्थितीत नेऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आज होणाऱ्या मूक मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असा आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे.
काय आहे वनतारा?
दरम्यान, Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापित Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. 3,500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3,300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा घर आहे, ज्यामध्ये व्याघ्र, मगर, अजगर, न्यूमथुन आणि हत्तीही समाविष्ट आहेत. 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी केले, तेथे त्यांनी MRI, CT‑scan, हायड्रोगीक मसाज, हात्त्यांसाठी हायड्रोथेरपी अशा आधुनिक सुविधा निरीक्षण केले आणि हात्ती, चिंपांझी, काराकल व इतर दुर्लभ प्रजातींसह संवाद साधला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























