एक्स्प्लोर

Shahuwadi Taluka Ground Report : शाहूवाडी तालुक्याला कोल्हापूरच्या राजकर्त्यांनी 'दुर्लक्ष'वाडी केलं आहे का? डोंगर कपाऱ्यातील लोकांच्या वेदना अस्वस्थ करत नाही का??

Shahuwadi Taluka Ground Report : पाणी, रस्ते, वन्यजीवांकडून होत असलेली नासधूस आणि वनविभागाच्या तुघलकी कारभाराने संपूर्ण शाहूवाडी तालुका समस्यांच्या गर्तेत आहे.

Shahuwadi Ground Report : कोल्हापूरचे (Kolhapur) शिल्पकार छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहूवाडी तालुक्याला (Shahuwadi) राज्यकर्त्यांनी 'दुर्लक्ष'वाडी करून टाकलं आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर तालुक्याच्या नावाने विकासाच्या गप्पा ठोकून पुन्हा पाच वर्षांनीच तोंड दाखवून पुन्हा पाने पुसून जाण्याचा प्रकार एकंदरीत झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील लोकांन दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्नांकडे दाद तरी कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाणी, रस्ते, वन्यजीवांकडून होत असलेली नासधूस आणि वनविभागाच्या तुघलकी कारभाराने संपूर्ण तालुका समस्यांच्या गर्तेत आहे. रोजगाराच्या शोधात पुण्या मुंबईत सर्वाधिक स्थलांतर झालेला तालुका आहे. शाहूवाडी तालुका चंदगडनंतर गावांचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यात एकूण 141 गावे असून संपूर्ण भाग दुर्गम आणि विकासापासून शेकडो किमी दूर आहे.  

शाहुवाडी गावाची प्रचंड दुरावस्था 

तालुक्याचं गाव असलेल्या शाहूवाडीलाच तुंबलेल्या गटारी, त्यामुळे पसरलेली दुर्गंधी, सार्वजनिक शौचालयाची वाणवा आणि त्यामुळे तरुणींसह महिलांना उघड्यावर शौचास, पाण्याची भीषण वाणवा यासारख्या भीषण परिस्थितीमुळे गावकरी हताश होऊन गेल्या आहेत. रणरणत्या उन्हाळ्यात महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. उन्हाळा अजून दोन अडीच महिने असतानाच गावात पिण्याचे पाणी नसल्याने महिलांचा दररोज आक्रोश सुरु आहे. कोळगाव गावच्या जॅकवेलमध्ये मोटर सोडून गावासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आता उन्हाळा तोंडावर असल्याने त्या गावातूनही शाहूवाडी पाणी देण्यासाठी प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी पाईप फोडणे, फ्युज काढून नेणे, सीम काढून नेणे असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासकांकडून याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

गावकऱ्यांचा आक्रोश अन् राज्यकर्त्यांना भूमिकेचा विसर 

गेल्या अनेक दिवसांपासून समस्यांच्या गर्तेत सापडेल्या शाहूवाडी तालुक्यात एबीपी माझा पोहोचला. यावेळी समस्त गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करताना ऐन सणात राज्यकर्त्यांच्या नावाने आक्रोश केला. राज्यकर्त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडल्याने एबीपी माझा त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम गावात आल्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी माजी सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, महिलांनी यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. बीएसपी महासंघाचे अध्यक्ष हणमंत कवळे, शशिकांत साळवी, शाहूवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच अश्विनी म्हापसेकर यांनी गावच्या समस्यांचा पाढाच वाचला. शाहूनगरमध्ये जमलेल्या अनेक महिलांनी पाण्याविना आणि शौचालय नसल्याने होणारी कुचंबना बोलून दाखवली.  

ग्रामपंचायत इमारत आली मोडकळीला 

गावचा झालेल्या विस्तार आणि ग्रामपंचायतीला खर्च पेलवत नसल्याने गावकऱ्यांना पायाभूत सुविधा देताना पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकमुखाने शाहुवाडीसाठी नगरपंचायतची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आणि कोणत्याही सेवा सुविधा मिळत नसल्याने अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता. आता पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम सरकारकडून लावण्यात आला आहे. मात्र, मूळ दुखणे कायम आहे. गावकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान आमदार तसेच खासदार अजूनही शाहुवाडीत पोहोचलेले नाहीत. 

शाहूवाडी नगरपंचायतसाठी मागणी

गावचा कारभार ज्या इमारतीतून हाकला जातो, तीच इमारत मोडकळीला आहे. ती इमारत कधीही अंगावर कोसळेल, अशीच परिस्थिती आहे. बीएसपी महासंघाचे हणमंत कवळे म्हणाले की, फेरनिवडणूक कार्यक्रम लावल्याने गावकऱ्यांच्या संमतीने आम्ही निर्णय घेणार आहोत. नगरपंचायतची मागणी असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. माजी उपसरपंच शशिकांत साळवी म्हणाले की, गावचा पसारा वाढल्याने गावकऱ्यांना सुविधा देता येत नाही. त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत नको आहे. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत. अश्विनी म्हापसेकर म्हणाल्या की, गेल्या आठ दिवसांपासून आम्हाला पाणी मिळत नाही. दिवसाआड पाणी मिळते. नगरपंचायतसाठी मागणी सुरु असल्याने प्रशासकांनी सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे.

गावच्या समस्यांवर प्रशासक काय म्हणाले?

शाहुवाडी गावच्या समस्यांवर बोलताना प्रशासक पी. एस. हेरवाडे यांनी आपली हतबलता बोलून दाखवली. प्रशासन गेल्या काही दिवसांपासून पाणी देण्यास असमर्थ ठरल्याची कबुली दिली. ते पुढे म्हणाले की, गावाला पाणीपुरवठा करणारी योजना खूप जुनी असून त्यामध्ये अनेक गळती आहेत. ती काढण्यात बराच पैसा खर्च होतो. ज्या जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो तेथून पेटीचे कुलूप तोडून फ्युज काढून नेल्या जातात, आम्ही त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरीकडे, गावासाठी जलजीवनमधून नवीन योजनेचं काम सुरु करण्यात आलं आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी 19 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, या कालावधीत काम पूर्ण होऊन पिण्यासाठी पाणी मिळेल का? याची शाश्वती ग्रामपंचायतीला सुद्धा नाही. त्यामुळे शाहूवाडी पिण्याचे पाणी आणि पायाभूत सुविधा मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शाहूवाडी तालुक्यातील गावांची सुद्धा अवस्था तीच 

दुसरीकडे, शाहुवाडी तालुक्याच्या गावची दुरावस्था झाली असतानाच तालुक्यातील धनगरवाडे तसेच वाड्या वस्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. हे कमी काय म्हणून दुर्गम भाग असल्याने जंगली जनावरांचा उपद्रव त्यांना हैराण करून सोडत आहे. प्रत्येक गावातील एकजण रात्रभर जीव धोक्यात घालून पीकाचे संरक्षण करण्यासाठी जातात. मात्र, कुटुंबाला ती व्यक्ती परत येईल की नाही? याची कोणतीही खात्री नाही. दुसरीकडे वनविभागाचा तुघलकी कारभार संतापात भर टाकणारा आहे. पिकाची नासधूस केल्यानंतर मिळणारी मदत म्हणजे भीक नको मदत आवरा अशी म्हणायची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. अनेक वाड्यांना जोडणारे रस्ते उखडून गेले आहेत. त्यामुळे दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी एसटी येते, काही ठिकाणी येतच नाही, त्यामुळे परिस्थिती आणखी विदारक झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget