(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif : कोल्हापूरचे 'पालकमंत्री' हसन मुश्रीफ म्हणतात, हा कसला राजा हा तर भिकारी! समरजितसिंह घाटगे यांच्यावर टीका
हे मला निष्ठा निकवणार आहे का? आम्ही शरद पवार साहेबांना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडलो. हा कसला राजा हा तर भिकारी...! असल्याची टीका मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ मानलं जाणाऱ्या कागलमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घमासान सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पातळी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांचं नाव न घेता टीका केली आहे. मुंबईत जाऊन अधिकाऱ्यांच्या बदलीची दलाली त्यांनी केली, अधिकाऱ्यांच्या बदलीची पत्र घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होते. हे मला निष्ठा निकवणार आहे का? आम्ही शरद पवार साहेबांना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडलो. हा कसला राजा हा तर भिकारी...! असल्याची टीका मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर केली आहे.
त्या माणसाने मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला
हसन मुश्रीफ म्हणाले की, शरद पवारांच्या वाटचालीमध्ये सुखदुःखात नेहमीच त्यांच्या पाठीशी राहून मी त्यांना गुरुदक्षिणा दिली. मात्र खोट्या तक्रारी करून मी त्या माणसाने मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. मी पवार साहेबांना सांगून अजित दादांबरोबर गेलो. मात्र, दर आठवड्याला केवळ बदल्या व कमिशनची कामे घेऊन भेटत होते गुरुदक्षिणा न देताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे साथ सोडली. गडहिंग्लमध्ये 16 कोटींच्या विकास कामांचा प्रारंभ आणि नगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका प्रधान कार्यक्रमात बोलताना मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जात, धर्म, पंथ, गट न पाहता येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण केली. मात्र खोट्या तक्रारी करून गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे पाप त्यांनी केले. फडणवीस यांनी त्यांना जे मागेल ते दिले तरी देखील त्यांनी महायुतीचे उमेदवार संजय घाटगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष होऊन अनेक कामे करून घेतली.
सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कागलमध्ये ईडी प्रकरण कोणामुळे झालं याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी घ्यायला हवी होती. त्या ह**खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळायला हवं होतं, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली होती. मुश्रीफ यांच्याकडून मुंबईमध्ये कागल गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला समरजिसिंह घाटगे यांनी सुद्धा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुश्रीफ यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. कागलध्ये ईडी पोहोचल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते. मात्र, घरातील महिला पुढे आली होती अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली होती.
इतर महत्वाच्या बातम्या