Kolhapur News : 'सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव - 2023' राष्ट्रीय स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव -पाटगाव’ला कांस्य पुरस्कार
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, पर्यटन विभागाच्या सचिव वी. विद्यावती यांच्या हस्ते सरपंच विलास देसाई व मधुमक्षिका पालक वसंत वास्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
![Kolhapur News : 'सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव - 2023' राष्ट्रीय स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव -पाटगाव’ला कांस्य पुरस्कार Kolhapur news honey villege Patgaon in Bhudargad taluka awarded bronze in the Best Tourism Village 2023 national competition Kolhapur News : 'सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव - 2023' राष्ट्रीय स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव -पाटगाव’ला कांस्य पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/29/93ae53a982d89a8a9606da79ab5d0a3b1695963928582736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून आयोजित ''सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव - 2023'' या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव असणाऱ्या पाटगावला कांस्य पुरस्कार मिळाला. त्यामुळे ‘मधाचे गाव -पाटगांव’ (Patgaon) अशी देशपातळीवर वेगळी ओळख झाली आहे. याची व परिसरातील विविध पर्यटनस्थळांची दखल घेत पुरस्कारासाठी निवड केली गेली. नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, पर्यटन विभागाच्या सचिव वी. विद्यावती यांच्या हस्ते सरपंच विलास देसाई व मधुमक्षिका पालक वसंत वास्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणे विभागाच्या उपसचिव शमा पवार, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यावेळी प्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग विभाग, नाबार्ड, पर्यटन आदी विभागाच्या माध्यमातून ‘मधाचे गाव-पाटगाव’ हा अभिनव उपक्रम येथे राबविण्यात आला.
स्थानिक पातळीवर मधुमक्षिका पालन, प्रत्यक्ष मध निर्मिती व विक्री यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण व इतर सहकार्य करण्यात आले. याकामी पालकमंत्री दीपक केसरकर,आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, तहसीलदार अश्विनी आडसूळ, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रोत्साहन दिले. तसेच शासकीय पातळीवर आर्थिक पाठबळ उभे केले.
गावाची नवी ओळख निर्माण झाल्यानंतर होणारे फायदे
सेंट्रल नोडल इन्स्टिट्यूट फॉर रुरल टूरिझम अँड होमस्टेजद्वारे पूर्ण पाठिंबा मिळेल आणि सहकार्य दिले जाणार आहे. यामध्ये गावाला G20 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेला प्रोजेक्ट 'लाईफ' (लाईफस्टाईल फॉर इंन्व्हायर्नमेंट) च्या मोठ्या छत्राखाली आणले जाणार आहे. पर्यावरणासाठी जीवनशैली यावर आधारित काम सुरु होईल. केंद्राकडून शाश्वत पर्यटनासाठी लाईफ अभियान सुरु करण्यात आले आहे. G20 राष्ट्रांमधील सर्वोत्तम पद्धतींचा उपयोग ग्रामीण पर्यटनाच्या प्रचारासाठी मार्गदर्शक म्हणून केला जाईल. या गावांचा आता राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पर्यटन मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटना आणि UNEP (संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम) तसेच इतर भागीदारांच्या पाठिंब्याने प्रचार केला जाईल. तसेच परिसरातील विविध पर्यटनस्थळांचा विकास होणार आहे. यामुळे स्थानिक पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. येथे पर्यटकांना मध निर्मितीची प्रक्रिया समजावी यासाठी ‘हनी पार्क’ उभारण्यात येणार आहे.
पाटगावमध्ये मधपाळांकडून मधाचे उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलनासाठी साहित्य पुरविण्यात येणार आहे. मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रिया युनिट उभारुन प्रक्रीया झालेल्या मधाचे पॅकेजिंग व ब्रँन्डींग करुन तो मार्केटिंगसाठी उपलब्ध होईल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)