एक्स्प्लोर

Kolhapur News : वाघनख्यांवरून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं; हसन मुश्रीफही म्हणाले, मला या वादात पडायचं नाही, पण...

वाघनख्या केवळ तीन वर्षांसाठी येणार असल्याने तसेच त्या शिवरायांनीच वापरल्या होत्या का? यावरून वादंग निर्माण झाले आहे. काही इतिहास संशोधकांसह आदित्य ठाकरे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe) यांनी ज्या वाघनख्यांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढला होता त्या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना होणार आहेत. वाघनख्या महाराष्ट्रात येत असलेल्या तरी त्या केवळ तीन वर्षांसाठी येणार असल्याने तसेच त्या शिवरायांनीच वापरल्या होत्या का? यावरून वादंग निर्माण झाले आहे. काही इतिहास संशोधकांसह आदित्य ठाकरे यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

संजय मंडलिकांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांना डिवचलं

आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे यांना स्वतःची नखे वाघनखें वाटत असतील, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिकांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबीयांना डिवचलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मृतीचिन्ह कोणतेही असेल त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करतील. तलवार आणि वाघ नखे दोन्ही आणणार आहोत. त्याचे स्वागत महाराष्ट्र करेल, असेही खासदार मंडलिक म्हणाले. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जी वाघ नखं आणतील ती खरी असतील. आदित्य ठाकरे यांना वाघ नख्यांबद्दल काय माहिती आहे हे मला माहित नाही, त्यांना स्वत:ची नखं वाघनखं वाटत असावीत, असा टोला संजय मंडलिक यांनी लगावाला. दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांना वाघ नख्यांबद्दल काय माहिती आहे हे मला माहित नाही अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

शिवरायांची ही वाघ नखे खरी आहेत का? 

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखे भारतात येणार आहेत, पण ही वाघनखे येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघ नखे खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल करत आक्षेप घेतला आहे. दरम्यान, येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखे मुंबईत आणण्यात येणार आहेत. वाघनखे मुंबईत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (1 ऑक्टोबर) लंडनला रवाना होणार आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत वाघनखे घेऊन येण्यासाठी 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहे. पुढील 3 वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांची वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
Embed widget