(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : भोगावती आणि बिद्री कारखान्यासाठी निवडणूक बिगुल वाजला; बिद्रीत शिंदे, अजित पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागणार
Kolhapur News : बिद्री कारखान्यांमध्ये माजी आमदार के.पी. पाटील यांची सत्ता आहे. या ठिकाणी सत्ता परिवर्तनासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कंबर कसली आहे.
कोल्हापूर : पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या अखेर भोगावती सहकारी साखर कारखाना (Bhogawati Sakhar Karkhan) आणि बिद्री सहकारी साखर कारखाना (Bidri Sakhar Karkhana) या दोन कारखान्यांची निवडणूक रणधुमाळी प्रत्यक्ष सुरू झाली आहे. दोन्ही कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील महिनाभर दसऱ्या दिवाळीमध्येच या दोन कारखान्यांच्य ऊसाच्या फड्यात आता निवडणुकीचे रंग भरणार आहेत. दोन्ही कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गट आमनेसामने येणार आहेत. बिद्री कारखान्यांमध्ये माजी आमदार के.पी. पाटील यांची सत्ता आहे. या ठिकाणी सत्ता परिवर्तनासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या साथीला भाजपचे समरिजतसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक यांचं बळ मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भोगावती साखर कारखान्यावर काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्याकडे निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असेल.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
‘भोगावती’साठी 19 नोव्हेंबरला, तर ‘बिद्री’साठी 3 डिसेंबरला मतदान होणार आहे. ‘भोगावती’ची अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर ‘बिद्री’साठी 26 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या दोन्ही कारखान्याची निवडणूक 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली होती. तथापि, भोगावती कारखान्याची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्थगिती आल्याने ‘भोगावती’ची प्रक्रिया ठप्प झाली होती.
पावसामुळे दोन्ही कारखान्यांची निवडणूक स्थगित
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 9 ऑक्टोबरपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली होती. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने या दोन्हीही कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ‘भोगावती’साठी 19 नोव्हेंबरला, तर ‘बिद्री’साठी 3 डिसेंबरला मतदान होणार आहे. ‘भोगावती’ची अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर ‘बिद्री’साठी 26 ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या दोन्ही कारखान्याची निवडणूक 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली होती. तथापि, भोगावती कारखान्याची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्थगिती आल्याने ‘भोगावती’ची प्रक्रिया ठप्प झाली होती.
‘भोगावती’ कारखान्यावर गेल्या पाच वर्षांपासून आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे; पण यावेळी पाटील यांनी अर्ज दाखल केलेला नाही. ‘बिद्री’वर गेल्या 10 वर्षांपासून माजी आमदार के. पी. पाटील गटाची सत्ता आहे. त्यांच्यासमोर आमदार प्रकाश आबिटकर यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांतील 218 गावांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र असून, 67 हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या (Bhogawati Sakhar Karkhana) निवडणुकीसाठी प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांकडून हरकत घेण्यात आली होती. याबातची सुनावणी झाल्यानंतर हरकती फेटाळून अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये राधानगरी आणि करवीर तालुक्यातील 27 हजार 561 मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 14 हजार 255 अ वर्ग तर 277 ब वर्ग असे 14 हजार 532 सभासद आहेत. तर करवीर तालुक्यातील 12 हजार 810 अ वर्ग, 217 ब वर्ग तर व्यक्ती सभासद 2 असे 13 हजार 29 सभासद पात्र आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या