(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Crime: ज्याने बापाचा खून केला, त्यालाच सुपारी देऊन पोटच्या मुलाचा काटा काढला! मुलाच्या छळाला कंटाळून बापाचे टोकाचे पाऊल
अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.
Kolhapur Crime: जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली होती. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. वडिलांनी 75 हजार रुपयांना सुपारी देऊन दोन साथीदारांसह खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. शहापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
हातकलंगले तालुक्यातील तारदाळमध्ये रेल्वे पटरीवर राहुल कोळीचा मृतदेह आढळून आला होता. राहूलने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत असतानाच काही अंतरावर रक्ताचे थेंब आणि थारोळे दिसून आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांकडे कसून चौकशी केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत वडील दिलीप कोळी यांनी विकास पवार आणि सतीश कांबळे यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
मुलाच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल
राहुल गेल्या 10 ते 12 वर्षांपासून व्यसनाच्या आहारी गेला होता. तसेच वडील दिलीप यांना घरातून निघून जा, अशी वारंवार धमकी देत होता. लोकांकडून पैसे घेऊन कर्जाचा डोंगर केल्याने वडील कंटाळून गेले होते. दिलीप यांनी ओळखीच्या विकास पवार आणि सतीश कांबळेशी संगनमत करून खून करण्याचा कट रचला. राहुलचा खून करण्यासाठी दोघांना 50 हजार रुपये त्यांनी दिले होते. पोलिस तपासात वडील दिलीप कोळी यांनी विकास आणि सतीशच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे.
विकास पवार हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार
दरम्यान खुनातील आरोपी विकास पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वतःच्या बापाचा खून केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यालाच दिलीप कोळी यांनी मुलाच्या खुनाची सुपारी देत खून केला. त्यामुळे मुलाच्या छळाला कंटाळून बापाला संपवणाऱ्या गुन्हेगाराच्या मदतीने लेकाला संपवल्याची चर्चा रंगली आहे.
प्रकार उघडकीस कसा आला?
तारदाळमधील दिलीप कोळीचा राहुल हा मुलगा असून तो विवाहित होता. तो दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत होता. सततच्या त्रासाने त्याची पत्नी मुलांसह माहेरीच गेली आहे. तसेच राहुलच्या वागण्याला आई-वडील कंटाळले होते. यावरून राहुलचे कुटुंबाबरोबर नेहमी भांडणे होत होती. राहुलचा आयकॉनिक कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे पटरीच्या लगत राहुलचा मृतदेह सापडला. पोलिसांना रेल्वेला धडक बसून मृत्यू झाल्याचा संशय होता, पण मृतदेहाच्या डोक्यावरचे वर्मी घाव आणि काही अंतरापर्यंत रक्ताचे थेंब अन् थारोळे दिसून आल्याने संशय बळावला. त्यानुसार घातपाताची शक्यता गृहित धरून तपास सुरु करण्यात आला.
पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांकडे चौकशी करत वडील दिलीप, भाऊ सचिनकडे चौकशी केली. चौकशीत पोलिसांना वडिलांचा दाट संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. कौटुंबिक वादातून वडील दिलीप कोळीने दोन साथीदारांसह राहुलचा खून केल्याची कबुली दिली. रोख 75 हजार रुपये विकास पोवार व सतीश कांबळे यांना दिले. सुरुवातीला 25 हजार रुपये आणि उर्वरित रक्कम खून झाल्यानंतर देण्याचा व्यवहार झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या