(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: आई गेल्याचं समजताच मुलानंही दुसऱ्याच दिवशी जीव सोडला; कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना
गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुलाचाही मृत्यू झाला.
Kolhapur News: जन्मदात्या आईचा कृष्णा नदीत पुजनासाठी गेल्यानंतर बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाने दुसऱ्याच दिवशी जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावामध्ये घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गोपाळ खंडू पाटील असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
उपचार सुरु असताना गोपाळ पाटील यांना मानसिक धक्का
गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी मंगळवारी ही घटना घडली. या घटनेनंतर गोपाळ पाटील यांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी बुधवारी त्यांचेही निधन झाले. ते डेंग्यूसदृश आजाराने आजारी असल्याने सांगलीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्यांच्या कानावर आईच्या निधनाची बातमी आल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांचाही मृत्यू झाला. माय लेकरांचा मृत्यू अवघ्या काही तासांच्या अंतरावर झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चालत्या गाडीवर स्कार्फ बांधणे भोवले, महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू
दुसरीकडे, चांदे (ता. राधानगरी) पुतणीच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम करून घरी येत असताना चालत्या दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर आदळल्याने कल्पना नारायण कुरणे (वय 42, रा. आंबेडकरनगर, कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. चालत्या गाडीवर डोक्याला स्कार्फ बांधताना त्यांचा मृत्यू झाला. राशिवडे ते चांदे मार्गावर घाटात हा अपघात जाला. कल्पना यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा हाकला होता. त्यांनी धुणी भांडी, घरकाम करून संसार चालवला होता. गेल्याच महिन्यात त्यांनी आपल्या लेकीचा विवाह करून दिला होता. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.
रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्याने कल्पना यांना तातडीने राशिवडेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलाने आई उठ म्हणत हाक देण्याचा प्रयत्न करत असताना इतरांनाही अश्रु अनावर झाले. कल्पना यांच्यावर माहेरी केळोशीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या :